दिलासादायक! पर्यटकांचे आवडते पर्यटनस्थळ झाले कोरोनामुक्त


मुंबई : आपल्यापैकी अनेकांचे आवडते पर्यटनस्थळ असलेले गोवा हे राज्य आता कोरोनामुक्त झाले असून गोव्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाचा रिपोर्ट दोन वेळेला निगेटिव्ह आल्यामुळे आता गोव्यात एकही कोरोनाबाधित नाही. यामुळे गोव्याला कोरोनामुक्त गोवा सरकारने जाहीर करावे अशी मागणी केली जात आहे.

गोव्यात आढळलेले कोरोनाग्रस्त बरे झाले असून सध्याच्या घडीला एकही कोरोनाग्रस्त रूग्ण गोव्यात नाही. गोव्यात ३ एप्रिलनंतर एकही नवीन कोरोना रूग्ण आढळून आला नसल्याची माहिती गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी ट्विट करून दिली आहे. १५ एप्रिल रोजी मुख्यमंत्र्यांनी हे ट्विट केले आहे.

देशात कोरोना संसर्गग्रस्तांची संख्या वाढत असून कोरोना रुग्णांची संख्या १४ हजार ३७८ वर पोहचली आहे. आतापर्यंत देशात ४८० रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत देशात १९९२ लोक कोरोनातून पूर्णपणे बरे झाले आहेत. महाराष्ट्रात कोरोनाग्रस्तांची संख्या ३२०५ इतकी झाली आहे. आतापर्यंत १९४ लोकांचा मृत्यू झाला आहे. तर ३०० कोरोनाग्रस्त बरे झाले आहेत. केंद्र सरकार देश कोरोनामुक्त होण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करत आहे. गोव्यात आता एकही कोरोनाबाधित रूग्ण राहिलेला नाही. २० एप्रिलनंतर राज्यातील काही गोष्टींवरील नियम शिथिल करण्यात येणार आहेत.

Leave a Comment