करोनाचे पुढचे पाउल आफ्रिकेत?


फोटो साभार बीबीसी
जगभरातील बहुतेक सर्व देशांना व्यापून राहिलेला कोविड १९ आता आफ्रिकेत उत्पात घडवेल अशी भीती जागतिक आरोग्य संघटनेच्या एका अहवालात व्यक्त केली गेली आहे. आफ्रिकेत सध्याच्या स्थितीत कोविडची लागण १८ हजार जणांना झाली असून १ हजार मृत्यू झाले आहेत. मात्र द. आफ्रिका, नायजेरिया, आयव्हरी कोस्ट, कॅमेरून, घाना या देशाच्या राजधानीतून ज्या वेगाने कोविड १९ दूरवरच्या भागात पसरत आहे तो वेग पाहता संक्रमितांची संख्या प्रचंड वेगाने वाढेल अशी भीती या अहवालात व्यक्त केली आहे.

अमेरिकेत गुरुवारी एका दिवसात कोविड १९ ने ४५९१ लोकांचा बळी घेऊन विक्रम केला आहे. बुधवारी मृतांचा आकडा २४९४ होता. अमेरिकेत संक्रमितांची संख्या ६ लाख ७२ हजारावर गेली असून ही संख्या जगाच्या एक तृतीयांश इतकी आहे. संयुक्त राष्ट्र आर्थिक आयोगाच्या अहवालानुसार आफ्रिकेत कोविड १९ चा प्रसार सामान्य वेगाने झाला तर तीन लाख नागरिकांचा बळी जाण्याची शक्यता आहे मात्र परिस्थिती बिघडली आणि संक्रमण रोखणे अशक्य बनले तर हाच आकडा ३३ लाखांवर आणि संक्रमितांची संख्या १२० कोटींवर जाण्याची भीती आहे.

Leave a Comment