१९ एप्रिल पासून लवकुश दूरदर्शनवर येणार


फोटो साभार ई बायोपिक
कोविड मुळे देशात लॉक डाऊन असल्याने घरबसल्या नागरिकांना करमणूक मिळावी आणि त्यांनी शक्यतो घराबाहेर पडू नये यासाठी दूरदर्शनने एके काळी तुफान गाजलेल्या रामायण आणि महाभारत या सारख्या मालिकांचे पुनर्प्रक्षेपण सुरु केले होते. त्यात आता लवकुश म्हणजे उत्तर रामायणची भर पडते आहे. ही मालिका १९ एप्रिल पासून रोज रात्री ९ वाजता आणि रविवारी सकाळी ९ वा प्रसारित केली जाणार आहे.

प्रसार भारतीचे सीइओ शशी शेखर म्हणाले देशात लॉक डाऊनची मुदत ३ मे पर्यंत वाढविली गेली आहे. शनिवारी रामायण मालिकेचा शेवटचा भाग प्रसारित होत आहे आणि रविवारी त्याचे रिपीट टेलिकास्ट होईल. त्यानंतर रात्री नऊ वाजता लव कुश मालिका सुरु होईल. सोशल मीडियावर या संदर्भात माहिती दिली गेली असून ही मालिका ३९ भागांची आहे. त्यात सीता वनवासापासूनची कथा आहे. लव कुश यांची भूमिका स्वप्नील जोशी आणि मयुरेश सगदेव यांनी केली आहे. रामायण आणि महाभारत मालिकांनी टीआरपी मिळविण्याचे रेकॉर्ड केल्याचेही त्यांनी सांगितले.

Leave a Comment