वन प्लस ८, प्रो, एक मिनिटात १०६ कोटी रुपयांची कमाई


चीनी स्मार्टफोन कंपनी वनप्लस ने त्यांचा नवीन वन प्लस एट आणि एट प्रो १७ एप्रिल रोजी ऑनलाईन लाँच केला असून एका मिनिटाच्या अवधीत २० हजाराहून अधिक फोन विकले गेल्याचे आणि त्यातून कंपनीला १०९ कोटी रुपयांपेक्षा ( १०० दशलक्ष युआन) अधिक कमाई झाल्याचे समजते. हा सेल चीन मध्ये झाला आणि त्यात वनप्लस चे बेस, एट आणि एट प्रो फोन सामील होते.

वनप्लस एट ची किंमत ३९९९ युआन म्हणजे ४३२०० रुपयांपासून सुरु आहे. त्यात ८ जीबी रॅम, १२८ जीबी स्टोरेज, १२ जीबी रॅम, २५६ जीबी स्टोरेज व्हेरीयंट सामीला आहेत. त्यातील १२ जीबी व्हेरीयंट ची किंमत ४५९९ युआन म्हणजे ४९७०० रुपये आहे. प्रो साठी याच किमती ८ जीबी व्हेरीयंट साथी ५३९९ युआन म्हणजे ५८३०० व १२ जीबी साथी ६४८०० रुपये अश्या आहेत. ही सर्व विक्री ऑनलाईन केली गेली आहे. प्रो ला क्वाड कॅमेरा सेटअप आणि ६. ७८ इंची डिस्प्ले आहे तर वन प्लस एट साठी ट्रिपल कॅमेरा सेट अप, ६.५५ इंची स्क्रीन आहे.

Leave a Comment