आले डिझायनर मास्क


फोटो साभार इंडिया टुडे
करोना मुळे आणखी किती दिवस बाहेर पडताना मास्क वापरावे लागणार हे आत्ताच सांगता येणार नाही. मात्र दीर्घकाळ मास्क वापरण्याची वेळ येणार अशी चिन्हे दिसू लागल्यावर मास्क हे फॅशन स्टेटमेंट बनणार याची चाहूल लागली आहे. मुंबईची प्रसिद्ध ड्रेस डिझायनर अनिता डोंगरे मास्क बनवू लागल्यावर ही शक्यता अधिकच वाढली असे म्हणता येईल. आत्ताच विविध रंगी, स्टायलिश आणि विविध मटेरियल पासून बनलेले मास्क वेगाने लोकप्रिय होऊ लागले असून युवा वर्गाने त्यांना विशेष पसंती दिली आहे.


फोटो साभार पिंटरेस्ट
आजकाल लॉक डाऊन मुळे बहुसंख्य युवा वर्क फ्रॉम होम करत आहेत. त्यामुळे पार्टी वेअर वॉर्डरोब बंदच आहे. त्यामुळे काहीतरी वेगळे वापरण्याची एकच वस्तू हाताशी आहे, ती म्हणजे मास्क. त्यामुळे ग्लॅमर आणि विविधता हवी तर डिझायनर मास्कला पर्याय नाही. बाहेर पडायची वेळ आलीच तर हे मास्क फॅशनेबल लुक साठी मोठाच हातभार लावत आहेत. एकदम पातळ कपड्यापासून मास्क बनविणे योग्य नाही तसेच ते मऊ हवेत आणि मजबूतही. दीर्घकाळ वापर करायचा असेल तर त्याची चेहऱ्यावर रॅश यायला नको आणि श्वास सहज घेता यावा असा सर्व विचार करून हे मास्क बनविले जात आहेत.


फोटो साभार झी न्यूज
सर्वसामान्य नागरिकांना सर्जिकल मास्कची आवश्यकता नाही. होजीअरी, कॉटनचे मास्क उत्तम कारण ते धुवून परत वापरता येतात. या दृष्टीने घरातील जुने रंगीबेरंगी कपडे, लेस, एम्ब्रॉयडरी, पायपिन अश्या विविध प्रकारांचा वापर करून हे मास्क घरी सुद्धा बनविता येणार आहेत.

२०१४ मध्ये चीनी डिझायनर विली एलिशने चीन फॅशन वीक मध्ये लेटेस्ट मास्क, फॅशन म्हणून सादर केले होते. चीन मध्ये प्रदूषण जास्त प्रमाणावर असल्याने त्यापासून बचावासाठी हा एक ग्लॅमरस पर्याय तिने दिला होता. या प्रकारच्या फॅशन मास्क मध्येच एलिशने त्या वर्षीच्या ग्रॅमी अवॉर्ड समारंभात हजेरी लावली होती.

Leave a Comment