शाओमीने लाँच केला स्मार्ट वॅक्यूम क्लिनर रोबॉट

चीनी कंपनी शाओमीने भारतात नवीन रोबोटिक वॅक्यूम क्लिनर लाँच केला आहे. याला एमआय रोबॉट वॅक्यूम-मॉप पी असे नाव दिले असून, याची किंमत 29,999 रुपये आहे. मात्र सुरूवातीच्या ऑफर अंतर्गत कंपनी या वॅक्यूम क्लिनरला 17,999 रुपयांमध्ये विकत आहे. यावर ग्राहकांना ईएमआयचा पर्याय देखील मिळेल.

हा रोबॉटिक वॅक्यूम क्लिनर कंपनीच्या क्राउडफंडिंग प्लॅटफॉर्मवर उपलब्ध असणार असून, 15 सप्टेंबरपासून याचे वितरण सुरू होईल.

या डिव्हाईसमधील महत्त्वाचे फीचर्स म्हणजे यात सफाईसाठी टू-इन-वन फीचर आहे. यात नेव्हिगेशनसाठी लेसर डिटेक्ट सिस्टम मिळेल. शिवाय 12 सेंसर्स दिले आहेत, जे एमआय होम अ‍ॅपद्वारे कंट्रोल करता येतील.

एमआयच्या या वॅक्यूम क्लिनरमध्ये जापानी ब्रशलेस मोटार मिळेल. ज्याची कचरा शोषून घेण्याची क्षमता 2,100Pa आहे. कंपनीचा दावा आहे की या डिव्हाईसची स्कॅनिंग क्षमता 8 मीटरपर्यंत असून, सँपलिंग रेट 2,016 टाइम्स प्रती सेकंद आहे. याशिवाय परफॉर्मेंस आणि डाटा कलेक्शनसाठी यात क्वॉड-कोर कोर्टेक्स-ए7 प्रोसेसर आणि ड्युअल कोर माली 400 जीपीयू देण्यात आला आहे.

या डिव्हाईसमध्ये 3,200 एमएएच बॅटरी देण्यात आली असून, जी ऑटोमॅटिक चार्जिंग सपोर्ट करते. सिंगल चार्जमध्ये हे वॅक्यूम क्लिनर 60 ते 130 मिनिटे काम करेल. युजर्स एमआय रोबॉट वॅक्यूम-मॉप पी ला एमआय होम अ‍ॅपशी कनेक्ट करू शकतात. ज्याद्वारे रिमोट कंट्रोल, रिअल टाईम मॅपिंग, शेड्यूल क्लिनिंग आणि स्पॉट क्लिनिंग सारखे फीचर्स वापरता येतील.

Leave a Comment