झूमला टक्कर देण्यासाठी व्हॉट्सअ‍ॅप आणणार हे खास फीचर

लॉकडाऊनमुळे व्हिडीओ कॉन्फ्रेंसिंग अ‍ॅपची लोकप्रियता वाढली आहे. याच पार्श्वभुमीवर आता इंस्टंट मेसेजिंग अ‍ॅप व्हॉट्सअ‍ॅप देखील ग्रुप कॉलिंग फीचरमध्ये बदल करणार आहे. ग्रुप कॉलिंगमध्ये आणखी लोक सहभागी होतील, अशा फीचरवर व्हॉट्स काम करत आहे.

सध्या व्हॉट्सअ‍ॅपच्या ग्रुप कॉलिंगमध्ये 4 जण सहभागी होऊ शकतात. मात्र व्हॉट्सअ‍ॅपच्या लेटेस्ट अँड्राईड बिटा व्हर्जनमध्ये ही संख्या वाढण्याची शक्यता आहे.

लॉकडाऊनच्या काळात झूम आणि गुगल ड्यूओ सारख्या अ‍ॅप्सची लोकप्रियता वाढली आहे. या अ‍ॅप्समध्ये डझनभर लोक एकाचवेळी व्हिडीओ कॉलिंग करू शकतात, ज्यामुळे या अ‍ॅप्सची लोकप्रियता मोठ्या प्रमाणात वाढली.

व्हॉट्सअ‍ॅपचे फीचर ट्रॅक करणाऱ्या WABetaInfo नुसार, नवीन फीचर व्हॉट्सअ‍ॅपच्या v2.20.128 बिटा आणि v2.20.129 बिटामध्ये पाहण्यास मिळाले. हे फीचर अद्याप सर्व युजर्ससाठी रोलआउट झालेले नाही.

हे फीचर कधी येईल, याबाबत अद्याप माहिती देण्यात आलेली नाही. याशिवाय ट्रॅकरनुसार लेटेस्ट बिटा अपडेटमध्ये ग्रुप कॉल्स फीचरमध्ये काही समस्या देखील आहे.

Leave a Comment