येथे चिंपांझीला मास्क घालून करायला लावली डिसइंफेक्शनची फवारणी, तक्रार दाखल

जगभरात कोरोना व्हायरसमुले प्राणीसंग्रहालय देखील पर्यटकांसाठी बंद आहेत. केवळ प्राण्यांची काळजी घेणारे कर्मचारीच प्राणीसंग्रहालयात येत आहेत. पर्यटक नसल्याने काही ठिकाणी प्राण्यांना मोकळे फिरू दिले जात आहे, तर काही ठिकाणी मात्र या प्राण्यांचा भलत्याच गोष्टींसाठी वापर केला जात आहे.

थायलंडच्या बँकॉक येथील समुत्परकर्ण मगर फार्म आणि प्राणीसंग्रहालयात चिंपाझीला गळ्यात पठ्ठा, शर्ट, डेनिम शॉर्ट्स आणि मास्क घालण्यात आला आहे. सोबतच सायकल चालवत डिसइंफेक्शनची फवारणी करण्यास सांगितली जात आहे व काम पुर्ण झाल्यानंतर चिंपांझी टाळ्या देखील वाजवत आहे.

फार्मचे संचालक उथेन यांगप्रफाकोरन यांच्यानुसार, सरकारने सांगितल्यापासून प्राणीसंग्रहालय बंद आहे. आम्ही आठवड्यातून दोन-तीनवेळा जागा स्वच्छ करतो, जेणेकरून सरकारने परवानगी दिल्यास सुरू करता येईल व पर्यटक भेट देऊ शकतील. चिंपांझीला शेतात प्रशिक्षण देण्यात आलेले आहे, या काळात काहीच करण्यासारखे नसल्याने थोडाफार व्यायाम करण्यासाठी त्याला बाहेर आणले आहे.

मात्र आता यासंदर्भात प्राण्याच्या संरक्षणासाठी लढणारी संस्था पेटाने पोलिसात तक्रार दाखल केली आहे.

पेटा आशियाच्या प्रवक्त्या निराली शाह याविषयी म्हणाल्या की, समुत्परकर्ण मगर फार्म आणि प्राणीसंग्रहालया सारखी ठिकाण चिंपांझी सारख्या प्राण्यांसाठी नरकासमान असून, येथे ते दररोज बंदीस्त जीवन जगत आहेत. त्यांच्यासोबत नियमित गैरव्यवहार केला जातो. जेव्हा ते मनुष्याच्या मनोरंजनासाठी वापरले जात नाही, त्यावेळी त्यांना पिंजऱ्यात कैद केले जाते.

Leave a Comment