रिव्हर्स रेपो रेटच्या कपातीचा नागरिकांना असा होणार फायदा

कोरोना व्हायरसमुळे 40 दिवसांच्या लॉकडाऊनची घोषणा सरकारने केली आहे. लॉकडाऊन अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसणार आहे. त्यामुळे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने पावले उचलण्यास सुरूवात केली आहे.

आज आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी व्हिडीओ कॉन्फ्रेंसिंगद्वारे आरबीआयच्या तयारीबाबत माहिती देत, अनेक महत्त्वाच्या घोषणा केल्या. यातील सर्वात मोठी घोषणा रिव्हर्स रेपो दरात केलेली कपातची होती. यामुळे नागरिकांना काय फायदा होणार आहे ? याविषयी जाणून घेऊया.

रिव्हर्स रेपो रेट म्हणजे काय ?

बँकांना आरबीआयकडे पैसे जमा करावे लागतात. या रक्कमेवर आरबीआय बँकांना व्याज देत असते. जेवढा अधिक रिव्हर्स रेपो रेट असेल, तेवढा बँकांना अधिक नफा होतो. जेव्हा रिव्हर्स रेपो रेट कमी होतो, तेव्हा बँकांना आरबीआयकडून मिळणारा नफा देखील कमी होतो.

आरबीआयचा उद्देश काय ?

जेव्हाही आरबीआयला वाटते की बाजारात रोख रक्कम वाढत आहे, त्यावेळी रिव्हर्स रेपो रेट वाढवला जातो. याचा उद्देश बँकेने जास्त व्याज मिळविण्यासाठी रक्कम आरबीआयकडे जमा करावी. मात्र जेव्हा बाजारात रोख रक्कमेचे संकट असते, त्यावेळी रिव्हर्स रेपो रेटमध्ये कपात केली जाते.

कोरोनामुळे बाजारात रक्कमेची कमतरता भासू नये याची आरबीआयला सर्वात मोठी चिंता आहे. रेपो रेटमध्ये कपात करत आरबीआयने बँकांना संदेश दिला आहे की पैसे जमा न करता ग्राहकांना कर्ज द्या.

नागरिकांना काय फायदा ?

रिव्हर्स रेपो रेटमध्ये कपात झाल्याने बँकांना आरबीआयकडून व्याज कमी मिळणार. अशा परिस्थितीत बँका रक्कम आरबीआयकडून काढून बाजारात गुंतवू शकते. म्हणजे बँक आपल्या ग्राहकांना जास्त कर्ज देऊ शकते. याद्वारे बँकांना जास्त फायदा होतो. अर्थव्यवस्थेला नियंत्रणात ठेवण्यासाठी हे महत्त्वाचे पाऊल आहे.

ग्राहकांना देखील नुकसान –

रिव्हर्स रेपो रेटमध्ये कपात केल्याने बँका पुन्हा एकदा आपल्या फिक्स्ड डिपॉजिटसह बचतींवरील व्याजदर कमी करण्याची शक्यता आहे.

Leave a Comment