ब्रह्मांडातील सर्वात पॉवरफुल ‘सुपरनोव्हा’चा लागला शोध

ब्रह्मांडात आतापर्यंत जेवढे सुपरनोव्हा (ताऱ्यांचा स्फोट) शोधण्यात आले आहेत, त्यातील सर्वात ताकदवर सुपरनोव्हाचा शोध लागला आहे. हा तारा सुपरनोव्हापेक्षा 10 पट अधिक शक्तीशाली तर आहेच, याशिवाय 500 पट अधिक चमकदार आहे.

वैज्ञानिकांचे म्हणणे आहे की हा सुपरनोव्हा दोन विशाल तारे एकमेंकाना धडकल्यानंतर एकत्र आल्याने झाला. ब्रिटन आणि अमेरिकेच्या वैज्ञानिकांनी नेचर एस्ट्रोनॉमी नावाच्या पीअर रिव्ह्यू जर्नलमध्ये प्रकाशित आपल्या रिसर्चमध्ये या संदर्भातील खुलासा केला आहे.

ब्रिटनच्या बर्मिंघम यूनिव्हर्सिटी आणि अमेरिकेच्या हार्वर्ड-स्मिथसोनियन सेंटर फॉर एस्ट्रोफिजिक्सने आपल्या या संशोधनाला एसएन-2016 एपीएस नाव दिले आहे. या संशोधनाचे लेखक इडो बर्गर यांना या सुपरनोव्हाला याच्या आकार आणि चमकपेक्षा अनेक बाबतीत खास म्हटे आहे.

सर्वसाधारण सुपरनोव्हा आपल्या एकूण उर्जेच्या केवळ 1 टक्केच प्रकाशापर्यंत मर्यादित असतो. मात्र याचा प्रकाश खूप अधिक आहे. याची उर्जा 20 ट्रिलियन गीगाटन टीएनटी स्फोटा एवढी आहे. याच्या आजुबाजूच्या ढगांमध्ये हायड्रोजनचे प्रमाण देखील अधिक आहे.

सुपरनोव्हा म्हणजे काय ?

एखाद्या खूप जुन्या ताऱ्याचा स्फोट झाल्यावर त्यातून निर्माण होणाऱ्या उर्जेला सुपरनोव्हा म्हणतात. अनेकदा एखाद्या ताऱ्यातून निघणारी उर्जा सुर्याच्या पुर्ण जीवनकाळातील उर्जेपेक्षा अधिक असते.

सर्वसाधारणपणे सुपरनोव्हाच्या निर्मितीमध्ये व्हाइट ड्वार्फची महत्त्वाची भूमिका असते. याच्या एका चमचाभर द्वव्याचे वजन देखील 10 टन असू शकते. अनेक ड्वार्फ गरम होतात व अचानक गायब होऊन जातात. तर काही व्हाइट ड्वार्फ दुसऱ्या ताऱ्यांबरोबर मिळून सुपरनोव्हाची निर्मिती करतात. मात्र नवीन सुपरनोव्हा ड्वार्फशी न धडकता दोन तारे एकमेकांमध्ये धडकल्याने निर्माण झाला आहे.

Leave a Comment