आता मायक्रोसॉफ्ट ट्रांसलेटरमध्ये आता मराठीचाही समावेश

मायक्रोसॉफ्टने आपल्या ट्रांसलेटर अ‍ॅप आणि साईटमध्ये 5 भारतीय भाषांचा सपोर्ट दिला आहे. या भाषांमध्ये गुजराती, मराठी, कन्नड, मल्याळम आणि पंजाबीचा समावेश आहे. मायक्रोसॉफ्ट ट्रांसलेटरमध्ये या सर्व भाषांचे रिअल टाईम भाषांतर करता येते. या नवीन 5 भाषांसह आता मायक्रोसॉफ्ट ट्रांसलेटरमध्ये एकूण 10 भारतीय भाषांचा सपोर्ट मिळत आहे.

मायक्रोसॉफ्टचा ट्रांसलेटरचा वापर वेबसाईट व्यतिरिक्त अँड्राईड आणि आयओएस अ‍ॅपवर देखील करता येईल. यामध्ये भाषांतरासाठी आर्टिफिशियल इंटेलिजेंस आणि डीप न्यूरल नेटवर्क इंहँस्डचा सपोर्ट आहे. मायक्रोसॉफ्ट ट्रांसलेटर विंडोजसाठी देखील उपलब्ध आहे.

फीचर्सबद्दल सांगायचे तर मायक्रोसॉफ्ट ट्रांसलेटरमध्ये टेक्सट, ऑडिओ आणि फोटोद्वारे भाषांतर करता येते. लवकरच यामध्ये मायक्रोसॉफ्ट ट्रांसलेटरचा सपोर्ट मायक्रोसॉफ्ट ऑफिस आणि स्विफ्ट कीबोर्डवर मिळण्याची शक्यता आहे.

Leave a Comment