लॉकडाऊन : मोकळ्या रस्त्यावर पहुडलेल्या सिंहांचे फोटो व्हायरल

कोरोना व्हायरसमुळे जगभरात लॉकडाऊनची स्थितीत आहे. याचा नागरिक आणि अर्थव्यवस्थेवर विपरित परिणाम पाहण्यास मिळत असला तरी प्राणी आणि पर्यावरणावर चांगला परिणाम दिसून येत आहेत. लॉकडाऊनमुळे हवेतील प्रदुषण कमी झाले आहे. प्राणी शहरातील रस्त्यांवर फिरताना आढळत आहेत. प्राण्यांना लॉकडाऊनमधील शांतता खूपच भावली असल्याचे दिसून येत आहे.

सध्या अशाच मोकळ्या रस्त्यावर झोपलेल्या सिंहांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. लॉकडाऊनमुळे लोक घरात असताना, मोकळ्या रस्त्यांवर हे सिंह निंवातपणे आराम करत आहेत.

दक्षिण आफ्रिकेतील क्रुगेर राष्ट्रीय उद्यानात हे सिंग मोकळ्या रस्त्यावर झोपताना आढळले. जवळपास 10 सिंह रस्त्यावर निंवात आराम करतानाचे सुंदर दृश्य सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

या सिंहांचा फोटो उद्यानातील रेंजर रिचर्ड सोव्री यांनी काढला आहे. माणसे घरात असल्याने सिंह या स्वातंत्र्याचा आनंद घेत आहेत.

रिचर्ड सोव्री याविषयी म्हणाले की, हे सिंग सर्वसाधारणपणे झाडेझुडपांमध्ये असतात. मात्र ते हुशार आहेत आणि आता ते आपल्याशिवाय उद्यानातील स्वातंत्र्याचा आनंद घेत आहेत.

नेटकऱ्यांना देखील सिंहांचा रस्त्यावर असा निंवात झोप काढण्याचा आनंद भलताच आवडला. यावर अनेकांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या. इतर अन्य उद्यानाप्रमाणेच क्रुगेर राष्ट्रीय उद्यान देखील 25 मार्चपासूनच बंद आहे.

Leave a Comment