ट्रम्प कन्या आणि जावयाकडून लॉकडाऊनची एैशीतैशी

अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांची कन्या इवांका ट्रम्प आणि जावई जरेड कुशनेर यांनी लॉकडाऊनच्या नियमांकडे दुर्लक्ष करत पासोवर साजरा करण्यासाठी प्रवास केल्याची माहिती समोर आली आहे. व्हाईट हाऊसने देखील या संदर्भात पुष्टी केली आहे.

इवांका आणि जरेड यांनी वॉशिंग्टन येथून न्यूजर्सीमधील गोल्फ रेसॉर्ट येथे प्रवास केले.. त्यांनी येथे ज्यू हॉलिडे साजरा केला. व्हॉइट हाऊसने या संदर्भात सांगितले की, इवांका कुशनेर थांबले जरी असले तरी बाहेरील कोणतीही व्यक्ती सहभागी झाली नव्हती.

व्हॉइट हाऊसनुसार, इवांका आणि तिच्या कुटुंबाने एका बंद घरात पासोवर साजरा केला. तिच्या डी.सी येथील घराजवळ जास्त लोक देखील राहत नाहीत. बेडमिन्स्टर येथे देखील त्यांनी सोशल डिस्टेंसिंग आणि लांब राहून काम केले. त्यांचा हा प्रवास कमर्शियल नव्हता. त्यांनी आपल्या कुटुंबासोबत खाजगीत सुट्टी घालवण्याचा निर्णय घेतला होता.

अमेरिकेत लोकांना घरीच राहण्याचे आदेश दिले आहेत. ज्याचा अर्थ कोणतेही अत्यावश्यक नसलेला प्रवास टाळणे गरजेचे आहे.

Leave a Comment