बबिता फोगाटच्या तबलिगी जमातीवर केलेल्या ट्विटमुळे खळबळ


एकीकडे देशात सध्याच्या कोरोना सारख्या जीवघेण्या व्हायरसचा सामना करत असतानाच दुसरीकडे सोशल मीडियावर याच्या विपरित युद्ध सुरु आहे. काही दिवसांपूर्वी स्टार कुस्तीपटू बबिता फोगाटने तबलिगी जमातीबद्दल एक ट्विट केले होते, त्यामुळे बराच वाद निर्माण झाला होता. त्यामुळे तिचे ट्विटर अकाऊंट निलंबित करण्याची मागणी सोशल मीडियावर होत आहे. पण यावर बबिताने एक व्हिडिओ प्रसिद्ध करून प्रतिक्रिया दिली आहे.


बबिता फोगाटने तिच्या व्हिडिओमध्ये म्हटले आहे की, माझ्या ट्विटनंतर गेल्या काही दिवसांपासून लोक मला धमकावत आहेत. बबिता म्हणाली की मी काही जाहिर वसिम नाही, जी धमक्यांना घाबरून घरी बसेन. बबिता फोगाट पुढे म्हणते की तबलिगी जमातमधील लोकांमुळे देशात कोरोनाचा प्रसार झाला आहे, आज देशात बरीच प्रकरणे तबलिगी जमातीमुळे आहेत. बबिता म्हणते की, जर तबलिगी जमात कोरोनाचा प्रसार करत नसती तर आतापर्यंत देशातील लॉकडाउन संपले असते.

विरोधकांना प्रत्युत्तर देण्यासाठी बबिता फोगाटने एक व्हिडिओ ट्विट केला आहे, तर तिची बहीण गीता फोगटने देखील तिच्या समर्थनार्थ ट्विट केले आहे. या व्यतिरिक्त बबिता फोगाट यांच्या समर्थनार्थ आता अनेक कुस्तीपटू पुढे आले आहेत.


बबिता फोगाटच्या ट्विटनंतर सोशल मीडियावर लोकांच्या प्रतिक्रियांचा पूर आला आहे. एकीकडे काही लोकांनी बबिताच्या ट्विटचे समर्थन केले आहे तर दुसरीकडे त्याला एका विशिष्ट पंथांतील लोकांनी हा भयंकर हल्ला असल्याचे म्हटले आहे. ट्विटरवरील बबिता फोगाटचे ट्विटर अकाउंट निलंबित करण्याची मागणी होत आहे, तर बबिता फोगट यांच्या समर्थकांनी त्यांच्या बाजूने ट्रेन्ड करण्यास सुरुवात केली आहे.

वास्तविक, देशातील कोरोना विषाणूच्या वाढत्या घटनांमध्ये 15 एप्रिल रोजी बबीता फोगाटने एक ट्विट केले होते. ज्यामध्ये तिने देशातील कोरोना विषाणूच्या वाढत्या घटनांसाठी तबलिगी जमातीच्या लोकांना जबाबदार धरले. वादानंतरही बबीता फोगाटने हे ट्विट रिट्वीट केले.

Leave a Comment