रोहित शर्मा दुबईच्या क्रिक किंग्डमचा ब्रांड अम्बेसिडर


फोटो साभार डीटीनेक्स्ट
टीम इंडियाच्या मर्यादित षटक सामन्यांचा संघाचा उपकप्तान रोहित शर्मा दुबईच्या क्रिक किंग्डम क्रिकेट अॅकॅडमीचा ब्रांड अम्बेसिडर बनला आहे. करोनाच्या जागतिक महामारी काळात जगातील बहुसंख्य देशात लॉकडाऊन असले तरी या अकादमीच्या मेम्बर्सना रोहित ऑनलाईन क्रिकेट कोचिंग देऊ शकणार आहे.

क्रिक किंग्डम हा ऑनलाईन प्लॅटफॉर्म विद्यार्थी, कोच, अकादमी, यांच्या सुविधा एकत्र मिळण्यासाठी काम करतो. यात व्यवस्थापनाबरोबरच कोच, ग्राउंड बुकिंग साठी मदत केली जाते. रोहितने या संदर्भात प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकानुसार या अकादमीचे ध्येय स्पष्ट असून तेथे खेळाला व्यावसायिक रूप देण्याचे प्रयत्न केले जातात. या अकादमीशी मुंबईचा वेगवान गोलंदाज धवल कुलकर्णी ही जोडला गेला असून या आकादामिशी २० कोच जोडले गेले आहेत. त्यात प्रदीप इंगळे, प्रथमेश साळुंके यांचाही समावेश आहे.

Leave a Comment