लॉक डाऊनचे पूर्ण पालन करून ‘सोडा’ ची मद्य डिलीव्हरी


फोटो साभार कॅच न्यूज
कोविड १९ च्या उद्रेकामुळे जगभरातील अनेक देशात लॉक डाऊन आहे आणि त्यामुळे जीवनावश्यक वस्तू मिळविण्यासाठी नागरिक ऑनलाईन सुविधांचा वापर करत आहेत. मद्यपीना दारू कुठे आणि कशी मिळेल याची चिंता असून लॉक डाऊन मध्ये दारू दुकाने सुरु रहावीत अशी मागणी अनेक ठिकाणांहून केली जात आहे. अमेरिकेत करोनाचा उद्रेक भयावह आहे आणि लॉक डाऊन बरोबर अनेक नागरिक क्वारंटाइन आहेत. त्यांना हवे तेव्हा मद्य मिळावे म्हणून एका वायनरी शॉप मालकाने अजब युक्ती लढविली आहे.

मेरीलँड मधील हा वायनरी शॉप ओनर सोशल डीस्टन्सिंगचे नियम काटेखोर पणे पाळून त्याच्या ग्राहकांना घरपोच दारू डीलीव्हर करत आहे. त्यासाठी त्याचा ‘सोडा’ नावाचा कुत्रा त्याला मदत करतो आहे. स्टोन अर्बन वायनरी असे या दुकानाचे नाव असून मालक सोडाच्या पाठीवर एक कस्टमाईज कापडी बॅग बांधून त्यातून एकावेळी दोन बाटल्या ग्राहकांना पोहोचवीत आहे. पाठीवर दारूच्या बाटल्या घेऊन डिलीव्हरीवर निघालेल्या ‘सोडा’ चे फोटो आणि व्हिडीओ मालकाने फेसबुकवर शेअर केला असून त्याला तुफान लोकप्रियता मिळाली आहे.

अमेरिकेत करोना संक्रमितांची संख्या ६ लाखावर गेली असून २६ हजारापेक्षा अधिक लोक मरण पावले आहेत.

Leave a Comment