पर्सनल डेटा न देताही येथे मिळते सुरक्षित इमेल सेवा


फोटो साभार झी न्यूज
ई मेलचा वापर जगभरात वेगाने वाढला आहे आणि त्यामुळे निर्माण होणारे मेल हॅकिंगचे गुन्हेही त्याच वेगाने वाढत आहेत. युजरला इमेल अकौंट सुरक्षित असावे असे नक्कीच वाटत असते. अशी सुरक्षित ई मेल सेवा देणाऱ्या काही मेल आहेत ज्या एंड टू एंड इंक्रीप्शनने पूर्ण आहेत. यात तुम्ही पाठविलेला मेसेज फक्त तुम्ही आणि ज्याला पाठविला ती व्यक्तीच वाचू शकते.
प्रोटोन मेल ही सेवा सुरक्षेसाठीच प्रसिद्ध आहे.२०१३ साली सर्न संशोधकांनी ती लाँच केली. येथे अकौंट ओपन करण्यासाठी तुमच्या पर्सनल डेटाची गरज नाही तसेच ज्यात युजरचे लोकेशन कळते त्या आयपी अड्रेसचीही गरज नाही. ही ओपन सोर्स सोफ्टवेअर् आहे. मात्र यात थर्ड पार्टी युजरला ई मेल करण्याचे ऑप्शन असते. त्यासाठी प्रोटोन मेल ऐवजी पीएम डॉट मी हे फ्री अकौंट उघडावे लागते.

टूटा नोटा ही अशीच दुसरी इमेल सेवा आहे. युजरची प्रायव्हसी लक्षात घेऊन ती विकसित केली गेली आहे. जीमेल अथवा अन्य अकौंट मेसेज तात्पुरत्या अकौंट वरून पाठविले जातात. यात इन बॉक्स मध्ये स्टोर होणारा डेटा इंक्रीप्टेड असतो. हे अकौंट सात दिवसांसाठी असते. येथेही आयपी अड्रेस द्यावा लागत नाही. जर्मन कंपनी टूटाओ जीएमबीएच ने ही सेवा २०११ मध्ये लाँच केली असून टूटा या लॅटीन शब्दाचा अर्थ सिक्युअर असा असून नोटा म्हणजे मेल.

या दोन्ही सेवा अँड्राईड, आयओएस आणि वेब सपोर्ट करतात.

Leave a Comment