आता स्वप्नेही करता येणार हॅक


फोटो साभार वन झिरो
स्वप्न ही शास्त्राच्या दृष्टीने एक अवस्था आहे. अनेकजण जागेपणी स्वप्ने पाहतात आणि झोपेत तर सगळेच स्वप्ने पाहतात. त्या काळापुरती स्वप्ने खरी वाटतात पण स्वप्न कोणते पडावे यावर आपले नियंत्रण नसते. एमआयटी मधील संशोधकांनी आता स्वप्ने हॅक करणारे उपकरण बनविले आहे. त्याला ड्रीम हॅकिंग डिव्हाईस असे नाव दिले असून या उपकरणाच्या मदतीने आता तुम्ही तुमचे स्वप्न मध्येच बदलू शकणार आहात. म्हणजे स्वप्ने तुम्हाला हवी तशी पडणे शक्य होईल.

स्वप्नांचा माणसाच्या प्रत्यक्ष आयुष्यावर फार परिणाम होत नाही असे सायन्स सांगते. मात्र एमआयटी मधील २०१७ मध्ये लाँच झालेल्या ड्रीम लॅबचे मत याहून वेगळे आहे. संशोधक अॅडम होरोवित्झ यांच्या मते माणूस झोपेत जी स्वप्ने पाहतो त्याचा त्याच्या आयुष्यावर परिणाम होतो. स्वप्न पडल्याच्या दुसऱ्या दिवसाचा त्याचा मूड आणि कामाचा पर्फोर्मंस यांचा संबंध असतो. त्यामुळे लोकांना त्याच्या स्वप्नात हवा तो बदल करता आला तर ते अधिक चांगले आयुष्य जगू शकतील.

या डिव्हाईसच्या मदतीने स्वप्नात आवाज आणि सुगंध सामील करणेही शक्य होणार आहे. झोपेतून जाग येण्याच्या अगोदर यातील सेन्सर स्वप्नात हवे तसे बदल करतील आणि त्यामुळे त्याचा रिझल्ट हा पोझिटिव्ह असेल असाही या संशोधकांचा दावा आहे.

Leave a Comment