अद्भूत रहस्यमयी स्थान एम ट्रँगल


फोटो साभार मिस्ट्रीयस रशिया
जहाजे, विमाने, माणसे अचानक गायब होणारे आणि परत न मिळणारे रहस्यमयी ठिकाण म्हणून बर्म्युडा ट्रँगल विषयी आपण पुष्कळ ऐकले आहे, वाचले आहे. पण असाच आणखी एक रहस्यमयी त्रिकोण रशियाच्या पर्म शहरात असून तो एम ट्रँगल या नावाने ओळखला जातो.( molyobka triangle) हे नाव रशियातील एका आदिवासी जमातीचे आहे. पर्म शहरात सुमारे ७० किमी चौरस परिसरात हा त्रिकोणी प्रदेश आहे. त्याला मोल्योबका गाव असेही म्हणतात.

असे सांगतात एके काळी हे ठिकाण पवित्र स्थळ मानले जात असे. एखादा माणूस काही दिवस या भागात राहिला तर अधिक बुद्धिमान होतो, किंवा एखादा गंभीर आजार झालेला रोगी येथे राहिला तर त्याचा आजार औषधाविना बरा होतो असेही सांगितले जाते. येथे राहणाऱ्याला या जागी काही चमत्कारिक शक्ती आहेत याचा अनुभव येतोच असे म्हणतात.


या भागाचे आणखी एक विशेष म्हणजे कोणत्याही मोबाईल कंपनीचे नेटवर्क येथे काम करत नाही. मात्र या ठिकाणी असलेल्या एका मातीच्या टेकाडावर गेल्यास मोबाईल नेटवर्क मिळते. त्यामुळे या टेकाडाला कॉल बॉक्स म्हटले जाते. येथे असामान्य घटना अनेकदा घडतात. ढगांमधून पृथ्वीवर एक प्रकाश पुंज येताना दिसतो, आकाशात अजब चिन्हे, आकृत्या दिसतात आणि या जागी अनेकदा उडत्या तबकड्या पहिल्याचेही सांगितले जाते.

१९८० मध्ये हा प्रदेश प्रथम चर्चेत आला. त्यावेळी येथे अचानक वाहनाचा खूप गोंगाट ऐकू येऊ लागला. या ठिकाणापासून रस्ता ४० किमी दूर आहे. मग वाहनांच्या वर्दळीचा आवाज येतो कुठून याचा शोध सुरु झाला पण त्याचे उत्तर कधीच मिळाले नाही.

Leave a Comment