लॉकडाऊनमध्ये घराच्या बाहेर जायचे आहे ? असा काढा ई-पास

कोरोना व्हायरसमुळे सरकारने लॉकडाऊनचा कालावधी 3 मे पर्यंत वाढवला आहे. अत्यावश्यक सेवा पुरवणारे आणि आणीबाणीची स्थिती वगळता सर्व सेवा बंद करण्याचा निर्णय घेतलेला आहे. अत्यावश्यक सेवा अथवा अन्य इमर्जेंसी कामासाठी नागरिकांना घराच्या बाहेर पडण्याची परवानगी आहे. यासाठी नागरिकांना ई-पास काढावा लागेल.

अनेक राज्य आणि केंद्र शासित प्रदेशाने ई-पास सेवा सुरू केली आहे. यासाठी राज्य सरकारने वेबसाईट अथवा व्हॉट्सअ‍ॅपद्वारे ई-पास काढण्याची सुविधा दिली आहे. महाराष्ट्रातील नागरिक देखील अत्यावश्यक सेवेसाठी बाहेर जाण्यासाठी covid19.mhpolice.in या अधिकृत वेबसाईटवर जाऊन ई-पास काढू शकतात.

लॉकडाऊन दरम्यान ई-पास काढण्याची प्रक्रिया –

सर्वात प्रथम राज्याच्या अधिकृत लॉकडाऊन ई-पास वेबसाईटवर जावे. येथे तुम्हाला ई-पास का हवा आहे ? याची माहिती द्यावी लागेल. प्रत्येक राज्याची वेबसाईट युजर्सकडून वेगवेगळी माहिती मागते. महाराष्ट्रात ई-पाससाठी फोटो आयडी प्रुफ, वॅलिड ऑर्गनायझेशन, डॉक्युमेंट्स, मेडिकल रिपोर्ट आणि कंपनी आयडी मागितले जाते.

सबमिट केल्यानंतर स्थानिक पोलिसांद्वारे या अर्जाची तपासणी होईल व त्यानंतर पाससाठी परवानगी मिळेल. जर अर्ज करताना काही चुक झाल्यास स्थानिक पोलिस स्टेशनमध्ये जाऊन चुक दुरुस्त करता येते.

अर्जासोबत एक यूनिक टोकन आयडी मिळेल. अर्जाचे स्टेट्स तपासण्यासाठी युजर यूनिक आयडी टाकून तपासू शकतात. ई-पासला परवानगी मिळाल्यास फोनवर अधिकाऱ्यांद्वारे मेसेज येईल. ई-पासला युजर प्रिंट देखील करू शकतात. घरातून बाहेर पडताना हा पास नेहमी सोबत ठेवावा.

Leave a Comment