रिलायन्स-फेसबुक मिळून खास अ‍ॅप लाँच करण्याची शक्यता

रिलायन्स इंडस्ट्रीज आणि सोशल मीडिया कंपनी फेसबुक मिळून लवकरच एक खास अ‍ॅप लाँच करण्याची शक्यता आहे. या एका अ‍ॅपद्वारे अनेक काम करता येतील.

चीनचे अ‍ॅप व्हीचॅटप्रमाणे हे अ‍ॅप तयार केले जात आहे. यात मेसेजिंगसोबतच अनेक सेवा मिळतील. रिपोर्टनुसार, फेसबुक आणि रिलायन्सच्या या अ‍ॅपमध्ये ग्रोसरी शॉपिंग, रिचार्ज आणि पेमेंट सारख्या सेवा मिळतील.

या सुपर अ‍ॅपमध्ये गेमिंग, हॉटेल बुकिंग आणि सोशल मीडियाची देखील सुविधा असेल. भारतात व्हॉट्सअ‍ॅप आणि फेसबुकचे युजर जास्त असल्याने या अ‍ॅपला त्याचा फायदा होऊ शकतो. याशिवाय रिलायन्सकडे जिओ अ‍ॅप वापरणारे कोट्यावधी युजर्स आहेत. या व्यतिरिक्त रिलायन्स रिटेल स्टोर्स, ई-कॉमर्स, फिल्म अ‍ॅप आणि पेमेंट अ‍ॅपचे देखील नेटवर्क आहे. या अ‍ॅपमुळे दोन्ही कंपनीच्या विविध सेवा एकाच ठिकाणी उपलब्ध होतील.

ईटीच्या रिपोर्टनुसार, या टीममधील एका सदस्याने सांगितले की एक नवीन कंपनी बनवली जाऊ शकते. ज्यात दोन्ही कंपन्या गुंतवणूक करतील. अथवा फेसबुक रिलायन्स आणि रिलायन्स रिटेलमध्ये गुंतवणूक करू शकते. दोघांच्या भागीदारीसह एका नवीन वेंचरची सुरूवात होऊ शकते.

काही दिवसांपुर्वी फेसबुक जिओमध्ये गुंतवणूक करत 10 टक्के स्टेक्स खरेदी करू शकते, असा रिपोर्ट समोर आला होता. मात्र अद्याप दोन्ही कंपन्यांनी याबाबत कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही.

Leave a Comment