ट्विटरने सस्पेंड केले रंगोली चंदेलचे अकाउंट

अभिनेत्री कंगणा राणावतची बहीण रंगोली चंदेलचे अकाउंट ट्विटरने सस्पेंड केले आहे. आता यावरून रंगोलीने ट्विटरवर टीका केली आहे. रंगोलीने ट्विटरला पक्षपाती आणि भारतविरोधी म्हटले आहे.

रंगोली ट्विटरवरील आपल्या वादग्रस्त प्रतिक्रियांसाठी ओळखली जाते. रंगोलीने ट्विटरच्या नियमांचे उल्लंघन करणारे ट्विट केल्यानंतर तिचे अकाउंट सस्पेंड करण्यात आले आहे.

ट्विटरवर राग व्यक्त करत रंगोली म्हणाली की, हे पुर्णपणे पक्षपाती आहे. हे अमेरिकन प्लॅटफॉर्म आहे आणि आपल्या सर्वांनाच माहिती आहे की कशाप्रकारे पक्षपात करते. हे भारतविरोधी आहे. तुम्ही हिंदू देवी-देवता आणि पंतप्रधान व गृहमंत्र्यांना दहशतवादी म्हणून खिल्ली उडवू शकता, मात्र आरोग्य कर्मचारी आणि पोलीस कर्मचाऱ्यांवर झालेल्या दगडफेकीवर लिहू शकत नाही. असे केल्याने तुमचे अकाउंट सस्पेंड होते. हे काय आहे ?

रंगोली म्हणाली की, मी माझ्या मते आणि दृष्टिकोनाद्वारे पक्षपाती असलेले या व्यासपीठास बळकट करू इच्छित नाही. मी ट्विटरकडे कोणहीती बाजू मांडणार नाही. मी माझ्या बहिणीची (कंगना रणावत) प्रवक्ता आहे. माझी बहीण मोठी स्टार आहे. आपल्या चाहत्यांपर्यंत पोहचण्यासाठी तिच्याकडे अनेक पर्याय आहेत. एका पक्षपाती प्लॅटफॉर्मला सोडले तर आम्हाला काही फरक पडत नाही.

Image Credited – Navbharattimes

रंगोलीने एका विशेष समुदायालाच्या विरोधात हिंसक ट्विट केले होते. या ट्विटनंतर तिला अटक करण्याची देखील मागणी करण्यात आली. एका विशिष्ट समुदायाविरोधात हिंसक ट्विट केल्याने तिचे अकाउंट ट्विटरकडून सस्पेंड करण्यात आले आहे.

Leave a Comment