अ‍ॅपलचा बहुप्रतिक्षित सर्वात स्वस्त ‘आयफोन एसई 2020’ अखेर लाँच

अ‍ॅपलचा बहुप्रतिक्षित आयफोन एसई (2020) अखेर लाँच झाला आहे. सध्याच्या मॉडेलमध्ये सर्वात स्वस्त आयफोन आहे. या फोनला 2016 झाली लाँच झालेल्या आयफोन एसईचे सेकेंड व्हर्जन म्हणता येईल. या फोनमध्ये आयफोन 8 प्रमाणे 4.7 इंच स्क्रीन देण्यात आलेली आहे. याशिवाय किंमत कमी असतानाही  अ‍ॅपल ए13 बायोनिक चिपसेट देण्यात आलेले आहे. आयफोन एसई (2020) आयओएस 13 ऑउट ऑफ बॉक्सवर चालतो. यात टच आयडी फिंगरप्रिंट देखील आहे.

Image Credited – TechRadar

किंमत –

नवीन आयफोन एसईची भारतातील 64जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 45,500 रुपये आहे. 128जीबी व्हेरिएंटची किंमत 47,800 रुपये आणि 256 जीबी व्हेरिएंटची किंमत 58,300 रुपये आहे. भारतात हा फोन कधी उपलब्ध होईल, याची माहिती अद्याप देण्यात आलेली नाही. अमेरिकेत 17 एप्रिलपासून प्री-ऑर्डर सुरू होईल.

Image Credited – Forbes

आयफोन एसई स्पेसिफिकेशन, फीचर्स –

नवीन आयफोन एसईमध्ये 4.7 इंट रॅटिना एचडी आयपीएस एलसीडी डिस्प्ले देण्यात आला आहे. ज्याचे रिझॉल्यूशेन 750×1334 पिक्सल आहे. व्हाईट बँलेंस नियंत्रणात ठेवण्यासाठी ट्रू टोन टेक मिळेल. यात डॉल्बी व्हिजन आणि एचडीआर10 सपोर्ट देण्यात आलेला आहे. शिवाय डिस्प्ले पॅनल हॅपटिक टच सपोर्टसोबत येतो.

आयफोन एसईमध्ये आयफोन 11 सीरिजमध्ये देण्यात आलेली ए13 बायोनिक चिपसेट मिळेल. नवीन फोनमध्ये रिअरला एकमेव 12 मिगापिक्सल (अपर्चर एफ/ 1.8) कॅमेरा देण्यात आलेला आहे. सेल्फी आणि व्हिडीओसाठी यात 7 मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा देखील मिळेल.

Image Credited – NDTV

कनेक्टिव्हिटी फीचर्समध्ये 4जी एलटीई, वाय-फाय 802.11एएक्स, वाय-फाय कॉलिंग, एनएफसी, ब्लूटूथ, जीपीएस/ ए-जीपीएस आणि लाइटनिंग पोर्ट मिळेल. यात टच आयडी बटन बटन मिळेल.

डिझाईनमध्ये नवीन आयफोन एसई आयफोन 8 प्रमाणेच आहेत. फोनचे डायमेंशन 138.4×67.3×7.3 मिलीमीटर आणि वजन 148 ग्रॅम आहे. याशिवाय वॉटर आणि डस्ट प्रुफचे आयपी67 रेटिंग देखील मिळाले आहे. याव्यतिरिक्त कंपनीने फोनच्या बॅटरी आणि रॅमविषयी खुलासा केलेला नाही.

Leave a Comment