विमाधारकांना दिलासा, आता 15 मे पर्यंत भरू शकणार विम्याचा हप्ता

कोरोना व्हायरसमुळे सरकारने लॉकडाऊनचा कालावधी 3 मे पर्यंत वाढवण्याचा निर्णय दिला आहे. अशा स्थितीत सरकारने आरोग्य आणि मोटार (थर्ड पार्टी ) विमा धारकांना दिलासा दिला आहे. थर्ट पार्टी विमाधारक 15 मे पर्यंत आपल्या विम्याचा हप्ता भरू शकतात. केंद्रीय अर्थ मंत्रालयाने या संदर्भातील नॉटिफिकेशन जारी केले आहे.

केंद्रीय अर्थ मंत्रालयानुसार, लॉकडाऊनमुळे हप्ता भरण्यासाठी जो अधिकचा कालावधी मिळाला आहे, त्या काळात देखील विमाधारकांना विमा कव्हर मिळेल. तसेच या काळात काही क्लेम झाल्यास त्याची भरपाई मिळेल.

ज्या विमाधारकांचा आरोग्य अथवा मोटार वाहन (थर्ड विमा) विम्याची पॉलिसी रिन्यू तारीख 25 मार्च ते 3 मे 2020 यामध्ये आहे व जे हप्ता भरू शकत नाही, अशांसाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. आता असे विमाधारक 15 मे 2020 पर्यंत आपल्या विम्याचा हप्ता भरू शकतात.

थर्ड पार्टी मोटार विम्यामध्ये नुतनीकरण तारखेपर्यंत हप्ता न भरल्यास पॉलिसी समाप्त होते. मात्र सरकारने अधिक कालावधी देत, विमाधारकांना दिलासा दिला आहे.

Leave a Comment