लक्षाधीश शेतकर्‍यांचे गांव – हुआझी

commu1
शहरे म्हणजे सर्व सुखसुविधा असा समज आज जगात दृढ झाला आहे मात्र चीनमधील जियांगचिनजवळचे हुआझी हे छोटेसे गांव जगातील बड्या शहरांनाही या बाबतीच मागे टाकेल. चीनच्या उत्तर तटावर असलेल्या या गावात २ हजार लोक राहतात व त्यांचे वार्षिक सरासरी उत्पन्न १ लाख युरो म्हणजे ८० लाख रूपये आहे. म्हणजेच येथील सर्वच नागरिक लक्षाधीश आहेत.

commu
चीनच्या जियांगचिन भागातील हुआझी हे समाजवादी गांव म्हणून १९६१ ला स्थापन केले गेले. त्यावेळी या गावचे शेतीउत्पन्न अगदीच सुमार दर्जाचे होते. कम्युनिस्ट पार्टीचे माजी अध्यक्ष वू रेनवाओ यांनी या गावाचा चेहरामोहरा बदलण्यात महत्त्वाचे योगदान दिले. त्यांनी मल्टी सेक्टर कंपनी स्थापून सामुहिक शेती सुरू केली. या कंपनीची प्रगती इतकी वेगाने झाली की १९९० साली ती स्टॉक मार्केट मध्ये लिस्ट झाली. या गावचे नागरिक या कंपनीचे शेअरधारक आहेत. स्टील, सिल्क व पर्यटन व्यवसायाला या कंपनीने चालना दिली आहे. २०१५ मध्ये या कंपनीने ९.६ अब्ज डॉलर्सचा निव्वळ नफा कमावला आहे. हा नफा शेअर होल्डरना दिला जातो.

commu2
विशेष म्हणजे या गावात कमाईच्या ८० टक्के रक्कम कर म्हणून कापली जाते. त्या बदल्यात नागरिकांना रहायला बंगले, कार, आरोग्य, सुरक्षा, शिक्षण, हेलिकॉप्टरचा वापर या सुविधा मोफत पुरविल्या जातात. हॉटेलमधील खाणेपिणेही मोफत असते.तसेच ५० वर्षांपुढील महिला व ५५ वर्षांपुढील पुरूषांना पेन्शन दिले जाते व तांदूळ भाज्या फुकट दिल्या जातात. येथे स्थानिक रहिवाशांसोबत २० हजार शरणार्थीही आहेत. हे गांव अत्यंत आकर्षक आहे व त्यामुळे दररोज सरासरी ५ हजार देशी विदेशी पर्यटक येथे भेट देतात. त्यासाठी एंट्री फी भरावी लागते.

हे गांव हायटेकही आहे. ७४ मजली लॉन्झी इंटा हॉटेल या गावची शान आहे. सुधारणा घडवून आणण्यासाठी या गावाने कोणतेही कर्ज घेतलेले नाही तर लोकसहभागातूनच येथील सर्व कामे केली जातात.

Leave a Comment