या एकमेव शहरात आहेत अष्टभैरव, आणि नव दुर्गामंदिरे


फोटो साभार अमरउजाला
शिवभक्त असोत किंवा दुर्गाभक्त या दोन्ही प्रकारच्या भक्तांमध्ये भैरवाचे महत्व मोठे आहे. भैरव शंकराचे पूर्णावतारातील एक देवता मानली जाते आणि त्याला रुद्रावतार असेही म्हटले जाते. जेथे देवी तेथे तिच्या सुरक्षेसाठी भैरव असतो अशी समजूत आहे. देवी मंदिराच्या चारी बाजूला चारी भैरव पाहायला अनेक ठिकाणी मिळतात.

भारतात एक शहर मात्र असे आहे जेथे अष्टभैरव मंदिरे आहेत आणि त्याच्या सभोवती नउ दुर्गा मंदिरे आहेत. भैरवाचे वाहन आहे श्वान. त्याला भैरोबम म्हटले जाते. काही ठिकाणी भैरव देवीचा द्वारपाल रूपातही दिसतो. मात्र उत्तरांचल राज्यातील अल्मोडा हे एकमेव असे शहर आहे जेथे अष्टभैरव आणि नउ दुर्गा मंदिरे आहेत. हे शहर प्राचीन असून सांस्कृतिक आणि ऐतिहासिक दृष्टीने खास म्हणावे लागेल. काषाय पर्वताच्या अंगावर वसलेले हे शहर दैवी शक्तींनी परिपूर्ण शहर मानले जाते.


फोटो साभार पत्रिका
शहराच्या चार बाजूना अष्टभैरव आणि ९ दुर्गा मंदिरे असून या देवता शतकानुशतके शहराचे रक्षण करत आहेत असे मानले जाते. त्यातील एक कसारदेवी मंदिर असून या मंदिरातील अद्भूत चुंबकीय शक्तींनी नासाच्या वैज्ञानिकांना सुद्धा कोड्यात टाकले आहे. हे शहर चंद राजांनी वसविले आहे. शहराच्या चारी बाजूला विघ्नविनाशक गणेश मंदिरेही आहेत.

अष्टभैरव म्हणजे कालभैरव, बटुकभैरव, शाहभैरव, गढी भैरव, आनंदभैरव, गौरभैरव, बालभैरव आणि खुत्कुनिया भैरव तर नव दुर्गा म्हणजे मा नंदा, त्रिपुरसुंदरी, उल्का, शीतला, पाताल, कालिका आणि जाखन असे मानले जाते. अल्मोडा मध्ये भैरवाची एकूण १० मंदिरे आहेत मात्र त्यातील दोन खासगी आहेत.

Leave a Comment