मोदींचा गमछा सुपरहिट


फोटो साभार खबर एनडीटीव्ही
करोनामुळे देशात लागू झालेल्या लॉक डाऊनची मुदत वाढविण्यात येत असल्याचे पंतप्रधान मोदी यांनी मंगळवारी देशाला उद्देशून केलेल्या संबोधनात जाहीर केले तेव्हापासून सोशल मीडियावर मोदींनी त्यावेळी मास्क ऐवजी वापरलेला गमछा तुफान ट्रेंड होऊ लागला आहे. मोदी यांच्या ड्रेसिंग सेन्सची चर्चा तशी नेहमीच होते. मग तो मोदी कुर्ता असो वा मोदी जॅकेट. त्यात आता गमछाची भर पडली आहे. विशेष म्हणजे मोदी यांनी आपल्या भाषणात सुद्धा गमछा अथवा घरी तयार केलेले सुती मास्क वापरण्याचा आग्रह केला आहे.

सोशल मीडियावर पूर्ण देशभर गमछा हिट झाला आहेच पण सोशल मीडियावर गमछा चॅलेंज रूपातही ट्रेंड होत आहे. त्याचा थेट परिणाम बिहार उद्योग विभागावर पडला आहे. उद्योग मंत्री शाम रजक यांनी हिंदी चॅनलवरील एका चर्चेत बोलताना बिहार मधील विणकरांना मोठ्या प्रमाणावर गमछा विणण्याचे आदेश दिल्याचे सांगितले. सध्या १ लाख गमछे विणून तयार आहेत आणि ते स्वस्त किमतीत ग्राहकांना विकले जातील असेही त्यांनी सांगितले.

या माध्यमातून करोनापासून बचाव होईलच पण सध्या लॉक डाऊन असल्याने रोजगारी करणाऱ्या विणकरांना ज्या अडचणी येत आहेत त्या दूर होणार आहेत. गमछाची मोठी ऑर्डर मिळाल्याने त्यांना आपोआप रोजगार मिळाला आहे.

गमछा चॅलेंज मुळे मोदी बॉलीवूड स्टार्सच्या फॅशन रेस मध्ये सामील झाल्याची चर्चा होऊ लागली आहे. बनारस मधील बहुतेक फेसबुक युजर करोना पासून सुरक्षेसाठी गमछाला पसंती देत असल्याचेही दिसून आले आहे.

Leave a Comment