मंदी को मारो गोली,या देशाचा विकासदर ८६ टक्के


फोटो साभार डिंग
करोनाच्या संकटामुळे जगातील बहुतेक सर्व देश हैराण असून जागतिक आर्थिक मंदीचे संकट त्यामुळे निर्माण झाले आहे. अमेरिका, युरोप, भारत, चीन, जपान असे सर्व विकसित किंवा विकसनशील देशांचा विकासदर प्रचंड घटला आहे. मात्र एका देशाचा २०२० सालचा विकासदर तब्बल ८६ टक्के असेल असा अंदाज वर्तविला गेला आहे. जागतिक नाणेनिधीने द. अमेरिकेतील गुयाना या देशाचा विकासदर ८६ टक्के असेल असा अंदाज केला आहे.

या देशाची लोकसंख्या फक्त ७.८ लाख आहे. २०१९ मध्ये या देशाचा विकास दर ४.४ टक्के इतकाच होता. विकासदराची तुलना केली तर अमेरिकेच्या तो ४० पट अधिक होता. या देशातही करोना पोहोचला आहे आणि त्यामुळे ४७ नागरिकांना संक्रमण तर ६ मृत्यू झाले आहेत. पण तरीही या देशाचा विकासदर जास्त राहण्यामागे आहे येथे असलेले प्रचंड तेल भांडार. ओपेक देशांच्या यादीत सौदी अरेबिया सर्वाधिक तेल उत्पादन करतो तरी त्यांचा इंडीव्हिज्युअल रिझर्व १९०० बॅरल आहे. गुयानचा इंडीव्हिज्युअल रिझर्व ३९०० बॅरल आहे.

या देशात अजून अनेक ठिकाणी तेलं उत्पादन सुरुही झालेले नाही मात्र नवीन तेलं भांडार सतत मिळत आहेत असेही समजते.

Leave a Comment