करोना चॅलेंज मध्ये जगात महिला नेत्यांची कामगिरी उत्तम


फोटो साभार ब्लूमबर्ग
जगभर सध्या सर्व देशांना एकचा प्रश्न सतावतो आहे तो करोनावर कसे नियंत्रण आणता येईल हा. जगभरातील विविध देशाची सरकारे त्यासाठी हर प्रकारे प्रयत्नशील आहेत मात्र या युद्धात महिला नेत्यांनी जगापुढे आदर्श निर्माण केला असल्याचे प्रत्ययास आले आहे. जगभरातील ज्या देशात करोनाचा प्रभाव कमी जाणवतो आहे, तेथे महिला नेत्यांनी बजावलेली चांगली कामगिरी कारणीभूत आहे असे दिसून येत आहे. त्याउलट जगात महाशक्ती म्हणून गणल्या जाणाऱ्या देश प्रमुखांची हालत खराब म्हणता येईल इतकी त्यांची कामगिरी सुमार झाली आहे.


फोटो साभार सिटीझन
जर्मनीच्या चान्सलर अन्जेला मर्केल यांची कामगिरी अशीच लक्षणीय आहे. जर्मनीत १ लाख लोकांना करोना संसर्ग झाला असला तरी तेथे मृत्यूचे प्रमाण कमी आहे. मर्केल यांनी करोनाची पहिली केस आली तेव्हाच ६० टक्के जनता याच्या विळख्यात सापडू शकते असा इशारा दिला आणि सुरवातीपासून देशभर अनेक बंधने लादली. सोशल डीस्टंन्सिंगचे काटेखोर पालन, सेल्फ आयसोलेशन आणि करोना जागृती अतिशय प्रभावीपणे राबविली गेली. न्यूझीलंडच्या पंतप्रधान जेसिंदा ऑर्डन यांनीही १४ मार्च पासून जी व्यक्ती परदेशातून आली आहे त्या सर्वाना १४ दिवस सेल्फ आयसोलेशन बंधनकारक केले आणि संक्रमितांची संख्या १०० वर जाताच देशात लॉक डाऊन लागू केले. या काळात सर्व नियमांचे पालन काटेखोरपणे होत आहे यावर लक्ष दिले.


फोटो साभार सिटीझन
फिनलंडच्या सना मारीन या ३४ वर्षीय पंतप्रधान जगातील सर्वात तरुण पंतप्रधान आहेत. त्यानीही करोनाचा संसर्ग पसरतो आहे याची जाणीव होताच गरजेचे सर्व उपाय त्वरित केले. आणि सर्व नियमांचे पालन अनिवार्य केले. यामुळे ५५ लाख लोकसंख्येच्या या देशात ५९ मृत्यू इतके प्रमाण राहिले. कॅटरिन जकोब्स्डोटीस या आईसलंडच्या पंतप्रधान. त्यांनी अति थंडी मुळे कारोनाचा प्रसार अधिक होण्याचा धोका वेळीच लक्षात घेऊन त्याचा प्रकोप वाढू नये म्हणून हरसंभव प्रयत्न केले आहेत.

Leave a Comment