आरोग्य संघटनेची रसद रोखल्यानंतर ट्रम्प यांच्यावर बिल गेट्स यांची आगपाखड

अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी कोरोना व्हायरस महामारीच्या मध्य स्थितीत जागतिक आरोग्य संघटनेचा (डब्ल्यूएचओ) निधी रोखण्याचा निर्णय घेतला होता. यावर आता मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेट्स अनेक टीका करत जगाला आता सर्वाधिक डब्ल्यूएचओची गरज असल्याचे म्हटले आहे.

ट्रम्प यांनी डब्ल्यूएचओ कोरोना व्हायरसचे संकट चुकीच्या पद्धतीने हाताळत असल्याचे म्हणत निधी रोखणार असल्याचे म्हटले होता. अमेरिकेने मागील वर्षी डब्ल्यूएचओला तब्बल 4000 मिलियन डॉलर्सची मदत केली होती.

गेट्स यांनी ट्विट केले की, जागतिक आरोग्य संकटाच्या काळात डब्ल्यूएचओचा निधी थांबणे धोकादायक आहे. त्यांचे काम कोव्हिड-19 चा प्रसार कमी करत आहे आणि जर हे काम थांबले तर त्यांची जागा दुसरीच कोणतीच संस्था घेऊ शकत नाही. जगाला यापुर्वी कधीही लागली नाही एवढी आज डब्ल्यूएचओची गरज आहे.

ट्रम्प यांनी कोरोना व्हायरसचा प्रसार रोखण्यास असमर्थ ठरणे आणि याबाबत माहिती लपवल्याचा आरोप डब्ल्यूएचओवर करत निधी थांबविण्याचा निर्णय घेतला होता.

Leave a Comment