मित्रांच्या भेटीच्या योजनेवर पुणे पोलिसांनी फिरवले पाणी, दिले भन्नाट उत्तर

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लॉकडाऊनचा कालावधी 3 मेपर्यंत वाढविण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे आणखी काही दिवस नागरिकांना कोणतेही मित्र, नातेवाईकांना न भेटता घरातच राहावे लागणार आहे. लॉकडाऊनचा कालावधी वाढल्याने एकमेंकाना भेटण्यासाठी करण्यात आलेले प्लॅन्स देखील रद्द करावे लागले आहेत.

लॉकडाऊनमुळे असाच भेटण्याचा प्लॅन करणाऱ्या दोन मित्रांना पुणे पोलिसांनी चांगलेच उत्तर दिले आहे. ट्विटरच्या माध्यमातून पुणे पोलिसांनी दिलेल्या या उत्तराचे चांगलेच कौतूक होत आहे.

लॉकडाऊनचा कालावधी वाढल्यानंतर पार्थ नावाच्या एका ट्विटर युजरने लिहिले की, आता 3 मेपर्यंत नाही थांबू शकत, सॉरी.

याला उत्तर देताना इंद्रजित नावाच्या त्याच्या मित्राने लिहिले की, आपण त्याच्या आधी नक्कीच भेटू.

यावर पार्थने उत्तर दिले की, जग्गू आपण आता भेटू शकतो. तू एक गल्ली सोडून तर राहतो. तू बोल फक्त कधी.

मात्र या मित्रांच्या भेटण्याच्या योजनेवर पुणे पोलिसांनी पाणी फिरवले. पुणे पोलिसांनी या मित्रांना उत्तर दिले की, हाय, आम्हालाही सहभागी होत तुमच्यासोबत वेळ घालवायला आवडेल. तुम्ही सांगा फक्त कुठे आणि कधी ?

पुणे पोलिसांनी दिलेल्या हे हजारजवाबी उत्तर नेटकऱ्यांना देखील आवडले. अनेक युजर्सनी यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या.

Leave a Comment