दमदार फीचर्ससह वनप्लस 8, वनप्लस 8 प्रो लाँच

स्मार्टफोन कंपनी वनप्लसने आपले नवीन स्मार्टफोन वनप्लस 8 प्रो आणि बनप्लस 8 लाँच केले आहेत. हे स्मार्टफोन वनप्लस 7टी चे अपग्रेडेट व्हर्जन आहेत. या फोनचे वैशिष्ट्य म्हणजे यात 5जी सपोर्ट, होल-पंच डिस्प्ले आणि 12 जीबीपर्यंत रॅम देण्यात आली आहे.

किंमत –

वनप्लस 8 प्रोच्या 8 जीबी रॅम + 128 जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 899 डॉलर (68,400 रुपये) आणि 12 जीबी + 256 जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 999 डॉलर (76,000 रुपये) आहे. फोन ग्लेशियल ग्रीन, ऑनिक्स ब्लॅक आणि अल्ट्रामरीन निळ्या रंगात उपलब्ध असले.

तर दुसरीकडे वनप्लस 8 च्या 8 जीबी रॅम+128 जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 699 डॉलर (53,200 रुपये) आहे. तर 12 जीबी रॅम + 256 जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 799 डॉलर (60,800 रुपये) आहे. हे दोन्ही स्मार्टफोन भारतात कधी लाँच होणार याबाबतची अद्याप माहिती देण्यात आलेली नाही.

Image Credited – Navbharattimes

वनप्लस 8 प्रोचे स्पेसिफिकेशन आणि फीचर्स –

वनप्लस 8 प्रो हँडसेट अलर्ट स्लाइडरसोबत येतो. याच्या मदतीने सहज रिंगटोन अलर्ट्सला बंद करता येते. फोनमध्ये ड्युअल स्टीरियो स्पीकर्स देण्यात आलेले आहेत.

ड्युअल सिम (नॅनो) वनप्लस 8 प्रो अँड्राईड 10 वर आधारित ऑक्सिजनओएसवर चालतो. फोनमध्ये 6.78 इंचचा क्वाडएचडी+ (1440×3168 पिक्सल) फ्लूइड एमोलेड डिस्प्ले आहे. स्क्रीन 120 हर्ट्ज़ रिफ्रेश रेट, 19.8:9 आस्पेक्ट रेशिओ आणि 3डी कॉर्निंग गोरिल्ला ग्लास प्रोटेक्शनसोबत येते. यात ऑक्टाकोर क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 865 प्रोसेसर देण्यात आलेला आहे.

Image Credited – Navbharattimes

फोनमध्ये 4 रिअर कॅमेरे देण्यात आलेले आहेत. यातील 48 मेगापिक्सल प्रायमेरी कॅमेरा आहे. जो सोनी IMX689 सेंसर आहे. याशिवाय 8 मेगापिक्सल सेंकेंडरी, तिसरा 48 मेगापिक्सल आणि कॅमेरा सेटअपमध्ये 5 मेगापिक्सल कलर फिल्टर कॅमेरा सेंसर देखील आहे. स्मार्टफोनमध्ये 3x हायब्रिड सपोर्ट आणि 4K व्हिडिओ रिकॉर्डिंग क्षमता मिळते. सेल्फीसाठी यात 16 मेगापिक्सलचा सोनी IMX471 सेंसर मिळेल.

कनेक्टिविटी फीचर्समध्ये 5जी, 4जी एलटीई, वाय-फाय 6, ब्लूटूथ 5.1, जीपीएस/ ए-जीपीएस, एनएफसी आणि यूएसबी टाइप-सी पोर्टचा समावेश आहे. एक्सेलेरोमीटर, अँबियंट लाइट, जायरोस्कोप, फ्लिकर डिटेक्ट सेंसर, फ्रंट आरजीबी सेंसर, लेझर सेंसर आणि प्रॉक्सिमिटी सेंसर फोनचा भाग आहेत. फोनमध्ये इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर देखील मिळेल.

फोनमध्ये 4,510 एमएएच बॅटरी देण्यात आली असून, बॅटरी वार्प 30टी आणि वार्प चार्ज 30 व्हायरलेस सपोर्ट करते.

Image Credited – Navbharattimes

वनप्लस 8 चे स्पेसिफिकेशन –

हा फोन देखील अँड्राईड 10 वर आधारित ऑक्सिजनओएसवर चालतो. यात 6.55 इंच फूल एचडी+ (1080×2400 पिक्सल) फ्लूइड एमोलेड डिस्प्ले आहे. डिस्प्ले 90 हर्ट्ज़ रिफ्रेश रेट, 20:9 आस्पेक्ट रेशिओ आणि 3डी कार्निंग गोरिल्ला ग्लास प्रोटेक्शनसोबत येतो. स्मार्टफोनमध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 865 प्रोसेसर मिळेल.

Image Credited – NDTV

फोनमध्ये 3 रिअर कॅमेरे देण्यात आलेले आहेत. यात 48 मेगापिक्सल प्रायमेरी, 2 मेगापिक्सल सेकेंडरी आणि 16 मेगापिक्सलचा तिसरा कॅमेरा आहे. सेल्फीसाठी यात सोनी IMX471 सेंसर असलेला 16 मेगापिक्सलचा कॅमेरा दिला आहे.

या फोनमध्ये कनेक्टिव्हिटी फीचर्स वनप्लस 8 प्रो प्रमाणेच आहेत. दोन्ही स्मार्टफोनमध्ये मायक्रोएसडी कार्ड सपोर्ट मिळणार नाही.  वनप्लस 8 मध्ये 4,300 एमएएचची बॅटरी देण्यात आली असून, ही बॅटरी Warp Charge 30T चार्जर सपोर्ट करते.

Leave a Comment