लॉकडाऊनमध्ये देशी वर आणि परदेशी वधूच्या लग्नासाठी चक्क रात्री उघडले न्यायालय

लॉकडाऊनच्या काळात लग्न ठरलेल्यांना मोठी समस्या निर्माण होत आहे. एकतर साध्या पद्धतीने लग्न करावे लागत आहे, अन्यथा लग्नाची तारीख पुढे ढकलावी लागत आहे. मॅक्सिकोच्या एका मुलीची हरियाणातील एका मुलाशी ऑनलाईन मैत्री झाली होती. मुलगी लग्नासाठी भारतात देखील आली. मात्र त्याआधीच लॉकडाऊन सुरू झाले. मुलीची आई 24 एप्रिलला आपल्या देशात परतणार असल्याने रात्री 8 वाजता न्यायालय उघडले व दोघांचे लग्न पार पडले.

हरियाणाच्या रोहतक येथे हा विवाह पार पडला. रोहतकच्या निरंजन कश्यपची तीन वर्षांपुर्वी मॅक्सिकोच्या मुलीशी ऑनलाईन मैत्री झाली होती. निरंजन आणि मॅक्सिकोच्या डाना जोहेरी ऑलिव्हेरोस क्रूजची या दोघांची मैत्री 2017 साली एका ऑनलाईन स्पॅनिश लॅग्वेज कोर्स दरम्यान झाली होती.

2017 मध्ये निरंजन डानाला भेटायला मॅक्सिकोला देखील गेला होता. नोव्हेंबर 2018 मध्ये डाना आपल्या आईसोबत रोहतक येथे आली होती. त्यावेळी निरंजनच्या वाढदिवसाच्या दिवशी दोघांचा साखरपूडा देखील झाला होता.

दोघांच्या लग्नासाठी नागरिकत्व अडचण ठरत होते. अशावेळी मंजूरीसाठी जिल्हा मॅजिस्ट्रेटकडे अर्ज केला. लग्नात कोणतीही अडचण येऊ नये म्हणून जिल्हा मॅजिस्ट्रेटने पब्लिक नोटीस देखील काढली. मात्र लॉकडाऊनमुळे लग्न अडकले होते. मात्र अखेर रात्री 8 वाजता न्यायालय उघडवत दोघांचे लग्न लावण्यात आले.

निरंजनने सांगितले की, 24 एप्रिलला डानाची आई परत जाणार होती. मात्र 5 मेचे प्लाईट बुकिंग केले आहे.

वधू डानाने सांगितले की, 11 फेब्रुवारीला आईसोबत येथे आले होते. एका महिन्यात काम पुर्ण होईल असा विचार केला होता. मात्र लॉकडाऊनमुळे समस्या निर्माण झाली.  मॅक्सिकोमध्ये डानाचे वडील, लहान बहिण, आजी आणि इतर सदस्य राहतात.

Leave a Comment