बापरे ! तब्बल 26 वर्षांनंतर काढले या व्यक्तीच्या डोक्यात अडकलेले 4 इंच ब्लेड

चीनच्या शेडोंग प्रांतात येथे एक विचिक्ष वैद्यकीय प्रकरण समोर आले आहे. येथे 26 वर्षांपुर्वी एका व्यक्तीला मारलेला 4 इंच लांब चाकू डोक्यातून काढण्यात आला आहे.

मिरर युकेच्या रिपोर्टनुसार, या व्यक्तीचे नाव दुओरिजी आहे. 1990 च्या दशकात त्यांच्या डोक्यात 4 इंच लांब चाकूने मारण्यात आले होते. तेव्हापासून हा चाकू डोक्यातच अडकला होता. या घटनेनंतर व्यक्तीने कधीच डोक्यातून चाकू काढला नाही. 2012 मध्य देखील त्यांनी या बाबत डॉक्टरांचा सल्ला घेतला होता.

डोक्यात चाकू अडकलेला असल्याने डोकेदुखीची समस्या येऊ लागली, एका डोळ्याची दृष्टी देखील गेली. अखेर दोन दशकांनतर किघाई येथील डॉक्टरांनी दुओरिजी यांच्या डोक्यातील चाकू काढला. भागात हॉस्पिटल नसल्याने व्यक्तीला शेडोंग येथे आणण्यात आले.
रिपोर्टनुसार, चाकू रुग्णाच्या डोक्याच्या टोकावर होता. ज्यामुळे त्यांच्या डोळे आणि ऑप्टिक तंत्रावर परिणाम झाला.

डॉक्टरांनी ऑपरेशन करण्याआधी व्यक्तीचे डोके स्कॅन केले व त्या नंतर दोन भागात सर्जरी केली. दोन तासांच्या सर्जरीनंतर डॉक्टरांनी कवटीमधून 4 इंच लांब ब्लेड बाहेर काढले.

याबाबत डॉक्टर झांग शक्सियांग यांनी सांगितले की, रुग्ण आता काहीप्रमाणात व्यवस्थित असून, स्वतः चालू-फिरू शकत आहे. डोकेदुखी देखील कमी झाली असून, डोळ्यांची दृष्टी देखील परत आली आहे.

Leave a Comment