लॉकडाऊन : या व्यक्तीने भटक्या प्राण्यांसाठी बांधले ‘मिनी रेस्टोरेंट’

कोरोना व्हायरस महामारीमुळे जगभरातील अनेक शहर लॉकडाऊन आहेत. या काळात नागरिक आपआपल्या घरात कैद असल्याने प्राणी रस्त्यांवर मुक्तपणे संचार करत आहेत. मात्र जे भटके प्राणी मनुष्याच्या अन्नावर अवलंबून असतात, त्यांचे हाल होताना दिसत आहेत.

अशा प्राण्यांना अन्न उपलब्ध करून देण्यासाठी अनेक संस्था आणि वन्यजीवांसाठी काम करणारे कार्यकर्ते पुढे येत आहेत. असाच एक छोटासा प्रयत्न अमेरिकेतील डेट्रॉईट येथे राहणाऱ्या जेम्स व्रिलँडने केला आहे. जेम्सने आपल्या घरातील अंगणात प्राण्यांसाठी छोटेसे रेस्टोरेंट उभारले आहे.

या छोट्या फुड पार्कमध्ये पिकनिक टेबल्स आहेत, त्यावर वेगवेगळे पदार्थ, फळे ठेवण्यात आलेली आहेत. जेम्सने खार, पक्षी आणि इतर प्राण्यांसाठी रेस्टोरेंटमध्ये पाणी आणि अन्न ठेवले आहे. या छोट्या रेस्टोरेंट बाहेर नावाची पाटी देखील आहे, ज्यावर ‘मोइसॉन डू नॉईक्स’ असे लिहिले आहे. याचा अर्थ ‘अक्रोडचे घर’ असा होतो.’

View this post on Instagram

#eyebleach #brunchrush #🐿

A post shared by jamesvreeland (@jamesvreeland) on

रेस्टोरेंटमध्ये एक खारूताईची प्रतिमा देखील आहे. ज्यात खारीने डोक्यावर प्लेट पकडली आहे.

Leave a Comment