लॉकडाऊनचे नियम धाब्यावर बसवत येथे करण्यात आली जंगी पार्टी

इंडोनेशियामध्ये एका समूहाने वाढदिवसाच्या पार्टीमध्ये सहभागी होण्यासाठी लॉकडाऊनचे सर्व नियम धाब्यावर बसवले. पार्टीचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर लोक तीव्र प्रतिक्रिया देत आहेत.

बालीच्या लग्झरी व्हिलामध्ये या पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. व्हिडीओमध्ये दिसत आहे की लोक दारू पिऊन नाचत आहेत आणि गेम्स खेळत आहेत.

कोरोना व्हायरसमुळे अनेक देशांमध्ये लॉकडाऊन असून, लोक एकत्र येणे टाळत आहेत. अशात या पार्टीचे व्हिडीओ आणि फोटो व्हायरल होत आहेत. पार्टीमध्ये आलेल्यांमध्ये ब्रिटनची इंस्टाग्राम स्टार आणि दोन रशियन मॉडेल देखील दिसत आहेत.

व्हिडीओ आणि फोटो इंस्टाग्राम स्टार टायरोन हर्मिटने शेअर केले होते. मात्र टीका झाल्यावर फोटो आणि व्हिडीओ हटवण्यात आले.

इंडोनेशियामध्ये लॉकडाऊन करण्यात आलेले नाही. मात्र सरकारने सभा, पार्टी करण्यास मनाई केली आहे. येथे देखील सोशल डिस्टेंसिंग पाळण्याचे आवाहन केले जात आहे.

आपल्या 21 व्या वाढदिवसाच्या निमित्ताने पायलट महमूद अत्तियाद्वारे या पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. पार्टीमध्ये इंस्टाग्रामर टायरोन हर्मिट, सेनिया एल्दोशेंको आणि मॉडेल डोरोकोव्हा सेनिया हे सहभागी झाले होते. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर मोठ्या प्रमाणात टीका होत असून, यानंतर हर्मिटने माफी देखील मागितली.

Leave a Comment