लॉकडाऊन दरम्यान प्रेयसीला भेटायला गेलेल्या युवकाची तुरुंगात रवानगी

लॉकडाऊनमुळे लोकांना आपल्या मित्र-मैत्रिणी, नातेवाईकांना भेटणे अवघड झाले आहे. बाहेर पडल्यास शिक्षा होत आहेत. लॉकडाऊनच्या काळात आपल्या प्रेयसीला भेटण्यासाठी ऑस्ट्रेलियाच्या एका व्यक्तीने असाच प्रयत्न केला. मात्र लॉकडाऊनमध्ये बाहेर पडणे या व्यक्तीला चांगलेच महागात पडले आहे.

35 वर्षीय जोनाथन डेव्हिड गर्लफ्रेंडला भेटण्यासाठी लॉकडाऊनमध्ये बाहेर पडल्याने त्याला 1 महिन्याचा कारावास झाला आहे.

पश्चिम ऑस्ट्रेलियाच्या पोलिसांनी सांगितले की, 35 वर्षीय जोनाथनला लॉकडाऊनचे उल्लंघन करणे आणि पळून जाण्यासाठी अटक करण्यात आलेले आहे. त्याला पर्थच्या हॉटेलमध्ये क्वारंटाईन करण्यात आले होते.

न्यायालयाने असे का केले विचारले असता, प्रेयसीची आठवण येत होती असे कारण जोनाथनने दिले.

पोलिसांनी सांगितले की, तो फायर एग्झिटमधून आत घुसला. हॉटेलच्या कर्मचाऱ्यांना तर चकमा देण्यास त्याला यश मिळाले. मात्र सीसीटीव्ही कॅमेऱ्यापासून वाचू शकला नाही. लॉकडाऊनचे उल्लंघन केल्याने आता त्याला 1 महिन्यांचा कारावास आणि 2 हजार रुपये ऑस्ट्रेलियन डॉलर्स दंडाची शिक्षा ठोठवण्यात आली आहे.

Leave a Comment