या देशात लॉक डाऊनची वेगळीच तऱ्हा


फोटो साभार जागरण
कोविड १९ ची दहशत इतकी भयानक प्रकारे पसरली आहे की जगातील बहुतेक देशातील नागरिक आपापल्या घरात बंद झाले आहेत. अर्थात लॉक डाऊन लागू करताना अनेक देश काही नवे आणि वेगळे प्रयत्न जरूर करत आहेत. पेरू आणि पनामा या देशांनी मात्र लॉक डाऊन करण्यासाठी ज्या मार्गाचा वापर केला आहे तसा जगातील अन्य कोणत्याच देशात केला गेलेला नाही.

लॉक डाऊन असले तरी नागरिकांना गरजेच्या वस्तू मिळाव्यात यासाठी काही सवलती तसेच विशेष सुविधा सर्वच देशांनी दिल्या आहेत. मात्र वरील दोन्ही देशांनी या सवलती जेंडरच्या हिशोबाने दिल्या आहेत. या देशात आवश्यक सामान आणण्यासाठी घराबाहेर पडताना महीला आणि पुरुष यांच्यासाठी वेगवेगळे दिवस ठरविले गेले आहेत. पेरू मध्ये सोमवार, बुधवार आणि शुक्रवार फक्त पुरुष बाहेर पडू शकतात तर मंगळवार, गुरुवार आणि शनिवारी फक्त महिला.

पनामा मध्ये महिला आणि पुरुष बाहेर पडण्यासाठी पेरूच्या बरोबर उलटे दिवस ठरविले गेले आहेत. रविवारी मात्र कुणीच घराबाहेर पडू शकत नाही. पेरूमध्ये १४ एप्रिल पर्यंत ९७८४ केसेस सापडल्या असून २१६ मृत्यू झाले आहेत आणि ६९२६ पेशंट बरे झाले आहेत. पनामामध्ये याच काळात ३४७२ केसेस, ९४ मृत्यू आणि ३३१७ पेशंट बरे झाले आहेत. १० मार्च ला येथे पाहिला करोना संक्रमित सापडला होता.

Leave a Comment