म्हणून ३ मे पर्यंत वाढविला गेला लॉकडाऊन


फोटो साभार वेबदुनिया
करोना नियंत्रणासाठी देशात १५ एप्रिल पर्यत लागू करण्यात आलेल्या २१ दिवसांच्या लॉकडाऊनची मुदत ३ मे पर्यंत वाढविल्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दूरदर्शनवरून देशाला संबोधन करताना केली असून ही मुदत ३ मे पर्यंत का वाढविली गेली या चर्चेला त्यामुळे तोंड फुटले आहे. मोदी यांनी लॉक डाऊन वाढविण्याची घोषणा करण्याअगोदर अनेक राज्यांनी लॉक डाऊनची मुदत ३० एप्रिल पर्यंत वाढविली होती मात्र केंद्राने आता संपूर्ण देशभरासाठी ही मुदत ३ मे केली आहे.

लॉक डाऊन संपण्याची तारीख जवळ येऊ लागली तेव्हाच अनेक राज्यांनी मोदी याना लॉक डाऊन ३० एप्रिल पर्यंत वाढवावा अशी विनंती केली होती तर काही राज्यांनी त्यांच्या अखत्यारीत ही मुदत ३० एप्रिल पर्यंत मोदींनी घोषणा करण्याअगोदरच वाढविली होती. मोदींच्या घोषणेनंतर देशभर ३ मे पर्यंत लॉक डाऊन राहणार आहे.

ही मुदत ३ मे पर्यंत वाढविण्याचे मुख्य कारण आहे ते एप्रिल अखेरी आणि मेच्या सुरवातीला येत असलेल्या सुट्ट्या. १ मे रोजी जागतिक कामगार दिन आहे तर २ आणि ३ मे रोजी शनिवार रविवार येत आहेत. ३० एप्रिल रोजी लॉक डाऊन उठविला गेला तर जोडून येणाऱ्या सुट्ट्यांमुळे नागरिक मोठ्या संख्यने घराबाहेर पडण्याची भीती आहे आणि अश्या परिस्थितीत सोशल डीस्टन्सिंग पाळणे अवघड बनेल शिवाय गर्दीवर नियंत्रण मिळविणेही अडचणीचे ठरू शकेल यामुळे ३ मे पर्यंत लोकांनी घराबाहेरच पडू नये असा विचार केला गेला आहे.

Leave a Comment