मोसादचे इस्त्रायलच्या करोना नियंत्रणात मोठे योगदान


फोटो साभार नवभारत टाईम्स
जगातील बहुतेक सर्व देशांप्रमाणे इस्त्रायलमध्येही कोविड १९ संसर्ग झाला मात्र त्यांना आवश्यक वैद्यकीय उपकरणे खरेदी तसेच विदेशी उत्पादन तंत्रज्ञान मिळण्यात फारश्या अडचणी आलेल्या दिसल्या नाहीत त्यामागे या देशाची गुप्तचर संघटना मोसादचे योगदान मोठे असल्याचे आता उघड झाले आहे. न्युयॉर्क टाईम्सने दिलेल्या बातमीनुसार मोसादने देशात सुरु असलेल्या करोना विरुद्धच्या लढाईत देशाच्या सैन्यबलाच्या बरोबरीने योगदान दिले. फक्त लष्कर या मोहिमेत उघड काम करत होते आणि मोसादने मागच्या दाराने आवश्यक मदत पुरविली.

हे उघडकीस आले जेव्हा इस्रायलच्या आरोग्यमंत्र्यांच्या केबिन मध्ये मोसाद प्रमुख योसी कोहेन दिसले तेव्हा. त्यातूनही आरोग्यमंत्र्यांना स्वतःच करोना संसर्ग झाल्याचे लक्षात आल्यावर त्यांच्या संपर्कात आलेल्या सर्वाना क्वारंटाइन केले गेले त्यात कोहेन यांचेही नाव आले. त्यामुळे कोहेन आरोग्य मंत्र्यांच्या केबिन मध्ये काय करत होते असा प्रश्न निर्माण झाला आणि वरील बाब उघडकीस आली.

मोसाद ही इस्रायलची गुप्त संघटना जगभर गुप्तचर मोहिमा पार पाडत असते. मात्र देशाच्या संरक्षण व्यवस्थेत त्यांचा थेट सहभाग नसतो. इस्त्रायल मध्ये करोनाची पहिली केस होण्याअगोदर जेव्हा जगभरातील अनेक देशात करोना निपटारा करण्याची काहीही तयारी नव्हती तेव्हाच मोसाद हॉस्पिटल्सना आवश्यक असणारी मेडिकल उपकरणे व अन्य सामग्री आंतरराष्ट्रीय नेटवर्कच्या सहाय्याने खरेदी करू लागले होते. त्यात व्हेंटिलेटर, गिअर यांचाही समावेश होता. मार्च मध्येच त्यासाठी कमांड कंट्रोल रूम तयार केली गेली होती आणि आवश्यक उपकरण पुरवठ्याची जबाबदारी कोहेन यांच्यावर होती.

यामुळे इस्रायल मध्ये करोनाचे ११ हजार संक्रमित आणि १०३ मृत्यू झाले तरी देश कधीच प्रभावित देशाच्या यादीत आला नाही. मोसादचे एजंट एकजूट आणि एक विचाराने काम करणारे आणि कोणत्याही किमतीवर दिलेले काम पूर्ण करणारे म्हणून ओळखले जातात. त्याचे प्रत्यंतर त्यांनी यावेळीही दाखवून दिले आहे.

Leave a Comment