मुरली विजयला एलीस पेरीबरोबर आवडेल डिनर डेट


फोटो साभार लेटेस्टली
टीम इंडियाचा ओपनर मुरली विजय याला ऑस्ट्रेलियाची, महीला क्रिकेट टीम मधील सौंदर्यवती क्रिकेटपटू एलीस पेरी हिच्यासोबत डिनर डेटवर जायला आवडेल असे त्यानेच सांगितले आहे. करोना मुळे देशभर लॉक डाऊन आहे आणि त्यामुळे अन्य सर्व खेळाडूंप्रमाणे मुरली सुद्धा त्याच्या घरात बंद आहे. मात्र या काळात चेन्नई सुपरकिंग इन्स्टाग्रामवर लाईव्ह गप्पांच्या कार्यक्रमात त्याने वरील गोष्टीचा खुलासा केला आहे.

मुरलीने यावेळी त्याचे करियर आणि आयुष्यातील काही घटना शेअर केल्या. त्याला जेव्हा कोणत्या दोन क्रिकेटर बरोबर डिनर डेटला जायला आवडेल असे विचारले गेले तेव्हा त्याने पहिले नाव त्याचा सहयोगी ओपनर शिखर धवन याचे घेतले तर दुसरे एलीसचे घेतले. त्याच्या आवडीचे फलंदाज कोण या प्रश्नाला त्याने वीरेंद्र सेहवाग, वसिम जाफर, गौतम गंभीर यांची नावे सांगितली आणि हे सर्व कमालीचे प्रतिभाशाली आहेत आणि त्याच्याकडे पाहूनच मी शिकतो आहे असेही सांगितले.

धोनी यांची एक छान आठवणही त्याने शेअर केली. मुरली म्हणाला, २०१४ मध्ये इंग्लंड विरुध्द खेळताना आमच्या चार विकेट फार लवकर पाडल्या. त्यावेळी धोनी ज्या शांतपणे खेळत होता त्याची आठवण मी कधीच विसरणार नाही. मुरली सध्या सर्वात जास्त क्रिकेटला मिस करतो आहे असेही म्हणाला.

Leave a Comment