करोनामुळे राफेलच्या भारत उड्डाणास विलंब


फोटो साभार द प्रिंट
भारतीय हवाई दलासाठी आवश्यक असलेली राफेल विमाने भारताला मिळण्यास काही आठवडे विलंब होणार असल्याचे भारतीय हवाई दलाकडून सांगण्यात आले. सध्या कोविड १९ मुळे जगभरात अनेक देशात लॉक डाऊन आहे. फ्रांस मध्यही लॉक डाऊन आहे तसेच भारतातही लॉक डाऊन आहे. त्यामुळे राफेलची मे अखेरी मिळणारी पहिली खेप थोडी उशिरा मिळणार असल्याचे समजते. ही विमाने अंबाला बेसवर ठेवली जाणार आहेत. लॉक डाऊन मुळे या बेसवरसुद्धा पूर्ण तयारी होऊ शकलेली नाही.

राफेल लढाऊ विमानांचा अंबाला हा पाहिला बेस असून पहिल्या स्क्वाड्रनचे नामकरण १७ असे केले आहे. हवाई दलाचे माजी प्रमुख एअरचीफ मार्शल बीएस धनुआ या नंबरच्या स्क्वाड्रनचे कमांडर होते. राफेलचे टेल नेम सुद्धा बीएस असेच असेल. तसेच चार राफेल विमानांचा टेल नंबर आरबी असेल. सध्याचे हवाई दल प्रमुख राकेशकुमारसिंह भादौरीया यांच्या नावावरून हा टेल नंबर आहे कारण ३६ राफेल विमानासाठी ६० हजार कोटींचे डील फायनल करण्यात त्यांनी महत्वाची भूमिका बजावली होती.

राफेलची पहिली खेप कधी येणार त्याची तारीख लॉक डाऊन संपल्यावर जाहीर केली जाणार आहे.

Leave a Comment