झूम अ‍ॅपच्या लाखो युजर्सचे अकाउंट हॅक, डार्क वेबवर 10 पैशात पासवर्डची विक्री

लॉकडाऊनच्या क्लाउड व्हिडीओ कॉन्फ्रेंसिंग अ‍ॅप झूमची लोकप्रियता मोठ्या प्रमाणात वाढली आहे. लाखो लोकांनी हे अ‍ॅप डाऊनलोड केले आहे. मात्र या अ‍ॅपच्या प्रायव्हेसीबाबत आता प्रश्न निर्माण झाले आहेत.

ब्लिडिंग कॉम्प्युटरच्या रिपोर्टनुसार, 5 लाखांपेक्षा अधिक झूम अकाउंट डार्क वेबवर विकले जात आहेत. आश्चर्याची गोष्ट म्हणजे अगदी स्वस्तात हे अकाउंट विकले जात आहेत. तर काही ठिकाणी मोफतमध्ये युजर्सचा डेटा विकला जात आहे. यामध्ये युजरनेम, पासवर्ड आणि युजरने शेअर केलेल्या माहितीचा समावेश आहे.

झूम युजर्सची माहिती चोरी करण्यासाठी क्रेडेंशियल स्टफिंग मेथडचा वापर केला जात आहे. रिपोर्टनुसार, ज्या युजर्सचा अ‍ॅक्सेस मिळत आहे, त्यांना एकत्र करून नवीन यादी तयार केली जात आहे व ही माहिती डार्क वेबवर विकली जात आहे.

सायबर सिक्युरिटी इंटेलिजेंस कंपनी सायबलच्या रिपोर्टनुसार, अनेक झूम अकाउंट्सची माहिती एका हॅकर फोरमवर विकण्यासाठी अपलोड करण्यात आलेली आहे.  कंपनीचा दावा आहे की, 5 लाखांपेक्षा अधिक झूम युजरचे लॉगइन डिटेल्स खरेदी करण्यात आले आहे. मात्र हे युजरला सुचना देण्यासाठी करण्यात आल्याचे कंपनीने सांगितले.  कंपनीने हा डेटा 10 पैसे प्रति अकाउंट असा खरेदी केला.

झूमने मात्र आपल्या युजर्सला या हॅकिंगबाबत काहीही माहिती दिलेली नाही. जर तुम्ही देखील हे अ‍ॅप वापरत असाल तर त्वरित अकाउंटचा पासवर्ड बदला. तुमच्या ईमेल आयडीचा पासवर्ड डेटा ब्रीचमध्ये लीक झाला आहे की नाही हे जाणून घेण्यासाठी Have I Been Pwned वेबसाईटवर जाऊन तपासू शकता.

Leave a Comment