अमेरिका भारताला विकणार 155 मिलियन डॉलर्सच्या मिसाईल्स आणि टॉरपिडो

कोरोना व्हायरसवरील परिणामकारक औषध म्हणून हायड्रोक्लोरोक्विनची निर्यात भारताने अमेरिकेस सुरू केली होती. आता याचा परिणाम दिसू लागला आहे. ट्रम्प प्रशासनाने भारतात तब्बल 155 मिलियन डॉलरचे हारपून ब्लॉक II मिसाईल्स आणि हलके वजनाचे टॉरपिडोस भारताला विकण्यास परवानगी दिली आहे.

डिफेंस सेक्युरिटी कोऑपरेशन एजेंसीने अमेरिकन काँग्रेसला पाठवलेल्या नॉटिफिकेशननुसार, 10 एजीएम-84एल हारपून ब्लॉक II एअर लाँचड मिसाईलची किंमत 92 मिलियन डॉलर्स, 16 एमके 54 ऑल अप राउंड हलके टॉरपिडो आणि 3 एमके 54 एक्सरसाइज टॉरपिडोची किंमत जवळपास 63 मिलियन डॉलर्स आहे.

पेंटागननुसार, यासंदर्भात भारत सरकारने दोन सैन्य हार्डवेअरसाठी विनंती केली केली होती. अमेरिका आणि इतर सहयोगी दलांची आंतर-कार्यक्षमता वाढविण्यासाठी समुद्र तटाच्या सुरक्षेसाठी हार्पून मिसाईल पी -8आय विमानात एकत्रित केले जाईल.

हार्पुन मिसाईलची निर्मिती बोइंगद्वारे केली जाईल, तर टॉर्पिडोस रायथेनद्वारे पाठवले जातील. एमके 54 हलके टॉरपिडो युद्धाच्या वेळी अँटी-सबमरीन कारवाई करण्यास सक्षम आहे. भारत हलक्या वजनाचे एमके 54 टॉरपिडो आपल्या पी-84 विमानात वापरण्याचा विचार करत आहे.

Leave a Comment