8 कॅमेरे असणारी टेस्लाची सेल्फ ड्रायव्हिंग कार नक्कीच असू शकते ‘सुपरह्युमन’ – मस्क

टेस्ला कंपनी ही आपल्या हटके कारसाठी ओळखले जाते. मॉर्डन कार काय करू शकते, याचे सर्वोत्तम उदाहरण टेस्ला कार आहे. भविष्यात तंत्रज्ञानाच्या साहय्याने अनेक अशक्य गोष्टी शक्य होतील. मात्र टेस्ला कार सुपरह्युमन्स ठरू शकते का ? एलॉन मस्क यांना मात्र असे वाटते.

टेस्ला कंपनीचे सीईओ एलॉन मस्क यांच्यामते भविष्यात टेक्नोलॉजीच्या मदतीने कंपनीच्या इलेक्ट्रिक व्हिकल्स नक्कीच सुपरह्युमन्स ठरू शकतात. या संदर्भात त्यांनी ट्विट देखील केले.

मस्क यांनी एका ट्विटला उत्तर देताना लिहिले की, मनुष्य 2 कॅमेरे वापरून गाडी चालवत असतो. जे हळू आणि अनेकदा विचलित होतात. मात्र टेस्ला 8 कॅमेरे, रडार, सोनार आणि नेहमीच अलर्ट देते, त्यामुळे नक्कीच सुपरह्युमन्स ठरू शकते.

टेस्ला यांनी दोन कॅमेऱ्यांचा उल्लेख मनुष्यांचे डोळे असा केला. सेल्फ ड्राईव्हिंग कार संदर्भात टेस्लो ओळखले जाते. मात्र फ्लोरिडो येथे झालेल्या अपघातानंतर यावर प्रश्न निर्माण झाले होते.

टेस्लाच्या सेल्फ ड्रायव्हिंग कार स्वतः लेन, एस्सेलेटर आणि ब्रेक हाताळतात. चालक केवळ सुपरव्हिजनसाठी गाडीत असतो. हे सर्व कॅमेरे आणि सेन्सरच्या माध्यमातून शक्य होते. यामुळे अनेकदा टेस्लाच्या ऑटोपायलॉट ड्रायव्हरने कार चालवण्यापेक्षा अधिक सुरक्षित समजल्या जातात. कारण त्यांच्यामध्ये विचलित होण्याचा धोका कमी असतो.

टेस्ला यांच्या ट्विटनंतर पुन्हा एकदा सेल्फ ड्रायव्हिंग कारविषयी वाद सुरू झाला आहे. कारण फ्लोरिडा येथील अपघातात ऑटोपायलॉट सिस्टमच्या डिझाईनला जबाबदार धरण्यात आले आहे.

इतर कारपेक्षा टेस्ला सेल्फ ड्रायव्हिंग का श्रेष्ठ आहे हे देखील कंपनीने वेबसाईटवर सांगितले आहे. टेस्लाच्या ऑटोपायलट कारमध्ये 8 कॅमेरे आजुबाजूला 360 डिग्री व्हिजिबिलीटी दर्शवतात. 12 अपडेटेड अल्ट्रोसोनिक सेंसर्स समोर येणाऱ्या गोष्टीची माहिती देतात. तर रडार जोरदार पाऊस, धुके, धुळ आणि समोरील गाडीची देखील माहिती देते.

Leave a Comment