ब्रँडेड कपडे घालून झोळी पसरणारे इम्रान खान झाले ट्रोल

पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी जगभरातील प्रमुख नेते आणि जागतिक आर्थिक संस्थांना विकासशील देशांचे कर्ज माफ करण्याचा विचार करावा असे आवाहन केले आहे. पाकिस्तानची अर्थव्यवस्था डबघाईला आली असून, कोरोना संकटामुळे यातून बाहेर पडणे अशक्य झाले आहे. मात्र या वेळी त्यांनी घातलेले हिरव्या रंगाचे पोलो टी-शर्ट चर्चेचा विषय ठरले.

इम्रान खान यांनी राल्फ लॉरेनचे टी-शर्ट घातले होते. ज्याची किंमत हजारोंच्या घरात आहे. काही साईटवर या टी-शर्टची किंमत 11 हजार तर कोठे 29 हजार रुपये आहे. यानंतर युजर्सनी इम्रान खान यांना ट्रोल करण्यास सुरूवात केली.

त्यांनी ट्विटवर व्हिडीओ संदेशद्वारे आवाहन केले की, मी आंतरराष्ट्रीय समुदाय, यूएनएसजी आणि आंतरराष्ट्रीय आर्थिक संस्थांना आवाहन करतो की कोव्हिड-19 चा सामना करणाऱ्या विकासशील देशांना सकारात्मक प्रतिसाद द्यावा.

https://twitter.com/NagrThe/status/1249511050325553153

युजर्सने विचारले की, जगासमोर हात पसरवताना ब्रँडेड कपडे घालणे गरजेचे होते ? किंमत समजल्यावर युजर्सनी त्यांना ट्रोल करण्यास सुरूवात केली. काही युजर्सनी या टी-शर्टच्या किंमतीचा खुलासा करत इम्रान खान यांना चांगलेच ट्रोल केले.

Leave a Comment