लॉकडाऊनमध्ये चाईल्ड पोर्नोग्राफीत 95% वाढ – ICPF

कोरोना व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी सरकारने देशव्यापी लॉकडाऊनचा निर्णय घेतला आहे. लॉकडाऊनमुळे लोक घरात कैद आहेत. मात्र याचा वाईट परिणाम देखील पाहण्यास मिळत आहे. लॉकडाऊनच्या काळात ऑनलाईन चाईल्ड पोर्नोग्राफीची मागणी वाढल्याचे समोर आले आहे.

इंडिया चाईल्ड प्रोटेक्शन फंडच्या (आयसीपीएफ) रिपोर्टनुसार, नोव्हेंबर-डिसेंबर महिन्यात भारतातील 100 शहरांमध्ये चाईल्ड पोर्नोग्राफीची मागणी सरासरी 50 लाख होती. मात्र आता ही मागणी 100 टक्क्यांनी वाढली आहे.

आयसीपीएफनुसार, पोर्नहब आणि ऑनलाईन डेटा मॉनिटरिंग वेबसाईट्सच्या डेटावरून हे समजते की ‘चाईल्ड पोर्न’, ‘सेक्सी चाईल्ड’ आणि ‘टीन सेक्स व्हिडियो’ अशा शब्दांच्या सर्चमध्ये वाढ झाली आहे.

जगातील सर्वात मोठी पोर्नोग्राफी वेबसाईट पोर्नहबच्या डेटानुसार, सरासरी ट्रॅफिकच्या तुलनेत 24 ते 26 मार्चदरम्यान भारतातील ट्रॅफिक 95 टक्क्यांनी वाढले आहे.

रिपोर्टनुसार, बहुसंख्य लोक स्कूल गर्ल सेक्स सारख्या सामग्रीत रस असतो. तसेच निश्चित वयोगटातील , सेक्सच्युल अ‍ॅक्शन आणि स्थळानुसार कंटेटमध्ये वाढत होत चालली आहे.  याशिवाय 18 टक्के जणांना हिंसात्मक व्हिडीओ पाहण्यास आवडतात.

भारतात चाईल्ड पोर्नोग्राफी पाहणाऱ्यांमध्ये 90 टक्के पुरूष आणि 1 टक्के महिलांचा समावेश आहे. याची मागणी करणाऱ्यांमध्ये सर्वच वयोगटातील व्यक्ती मोडतात.

Leave a Comment