कोरोना : चुकीच्या माहितीचे चीनला भोगावे लागणार गंभीर परिणाम

एकीकडे जगभरात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. तर दुसरीकडे दोन शक्तीशाली देशांमध्ये कोरोनावरून आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. अमेरिकेने चीनला इशारा दिला आहे की, कोरोना व्हायरसबाबत डब्ल्यूएचओ आणि इतर आंतरराष्ट्रीय संघटनाना चुकीची माहिती दिल्याचे परिणाम चीनला भोगावे लागतील.  कोरोनाची सुरूवात चीनच्या वुहान शहरातूनच झाली होती.

पत्रकार परिषदेत चीनला कोरोना व्हायरसचे दुष्परिणाम का भोगत नाही ? असा प्रश्न विचारला असता, ट्रम्प म्हणाले की तुम्हाला कसे माहित याचा काहीही दुष्परिणाम नाही ? मी तुम्हाला सांगणार नाही. चीनलाच समजेल.

सीनेटर स्टिव्ह डेन्स यांनी ट्रम्प यांना पत्र लिहिले की, अमेरिकेन सरकारने चीनकडून वैद्यकीय पुरवठा आणि उपकरणांवर असलेला निर्भरता समाप्त करावी आणि औषधे निर्मितीसाठी अमेरिकेत नोकऱ्या निर्माण कराव्यात.

Leave a Comment