कोरोनाचा काही फरक नाही, उत्तर कोरियाचा क्षेपणास्त्राचा मारा

सध्या जगभरातील देश कोरोना व्हायरस महामारीचा सामना करत आहेत. मात्र उत्तर कोरियाला या गोष्टीचा काहीही फरक पडताना दिसत नाही. हुकुमशहा किंम जोंग उन यांनी आधी देशात कोरोनाचा संसर्ग झाला नसल्याचे सांगितले, त्यानंतर क्षेपणास्त्राचा मारा करत जगाला आश्चर्यात टाकले आहे.

उत्तर कोरियाने देशाच्या संस्थापकांच्या जन्मदिनानिमित्ताने फायटर जेटने हवेतून जमिनीवर क्षेपणास्त्राचा मारा केला. हे क्रुझ मिसाईल असल्याचे सांगितले जात आहे. उत्तर पुर्वेतील किनाऱ्यावरील शहर मुनचोन येथे समुद्रात या क्षेपणास्त्राचा 40 मिनिट मारा करण्यात आला.

क्षेपणास्त्र लाँचसोबतच उत्तर कोरियाने सुखोई व्हेरिएंट फायटर जेटने देखील उड्डाण घेतले. याशिवाय अनेक अँटी-ग्राउंड क्षेपणास्त्रांचा पुर्व सागरात मारा करण्यात आला. या क्षेपणास्त्र लाँचचे लाईव्ह प्रक्षेपण देखील करण्यात आले.

उत्तर कोरियाचे संस्थापक आणि देशातील सर्वोच्च नेते किम जोंग उन यांचे आजोबा किम इल-सुंग यांच्या 108व्या जन्मदिनानिमित्ताने क्षेपणास्त्र लाँच करण्यात आले होते. या दिवशी उत्तर कोरियामध्ये सार्वजनिक सुट्टी असते.

Leave a Comment