२०२१ मध्ये अँड्राईड, आयओएस फोन्ससाठी नव्या इमोजी नाहीत


फोटो साभार जागरण
करोनाचा वाढता प्रभाव आणि त्यामुळे जगभरातील अनेक देशातील लॉक डाऊनचा परिणाम गुगल आणि अॅपल कंपन्यांसाठी इमोजी डेव्हलप करणाऱ्या युनिकोड कंसोर्सशियम कंपनीवर झाला असून या कंपनीने २०२१ मध्ये अँड्राईड आणि आयओएस फोन्ससाठी एकही नवी ईमोजी बनविली जाणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. कंपनीने नवीन ईमोजी लाँच ची तारीख सहा महिने पुढे ढकलली असून ती मार्च २०२१ वरून सप्टेंबर २०२१ अशी केली गेली आहे.

तारीख पुढे ढकलली गेल्यामुळे डेटा व स्पेसिफिकेशनवर परिणाम होणार आहे. युनिकोड १४.० लागू करण्याची तारीख सप्टेंबर २०२१ पर्यंत वाढविली याचाच अर्थ नवीन ईमोजी २०२२ पूर्वी बाजारात येऊ शकणार नाहीत असे वृत्त बिझिनेस इंसायडरने दिले आहे. ईमोजी इतिहासकर्ते व ईमोजीपिडिया प्रमुख जर्मी बर्ज म्हणाले युनिकोड १४.० मध्ये नवा ईमोजी नाही. यावर्षी कावळा, कुकिंग पॉट, फिंगर हार्ट सारख्या ईमोजी येणार होत्या, शिवाय बबल ट्री, ट्रांसजेंडर फ्लॅग, वूली मॅमथ सारख्या ईमोजी २०२० च्या यादीत आहेत. युनिकोड १३.० मध्ये या वर्षी जानेवारीत स्वीकारलेल्या ११७ ईमोजी मोबाईलवर येतील.

Leave a Comment